विचार : डोंट डिप्रेस (भाग-2)

विचार : डोंट डिप्रेस (भाग-1)

-अमोल भालेराव

आयुष्यात सगळं कसं अगदी छान चाललेलं असतं. पण अचानक असं काही अनपेक्षित घडतं, की आयुष्याची घडी विस्कटून जाते. वाटेला आलेले दुःख कितीही लहान असले तरी ते डोंगराएवढे मोठे वाटू लागते. कोणीतरी तुमच्या चांगुलपणाचा गैरफायदा घेतं, तुम्हाला वापरून फेकून देतं. एकटे पडतो आपण. खायला उठतो हा एकटेपणा.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

सौरभने आजोबांचं चित्र पूर्ण केले. तेवढ्यात त्यांच्याजवळ एक वृद्ध आजी आल्या. बहुतेक त्या त्यांच्या सहचारिणी असाव्यात. दोघेही एकमेकांजवळ बसून परत त्या समुद्राला न्याहाळू लागले. इतक्‍यात एक जोराची लाट आली आणि त्या लाटेचे पाणी उडालं त्या दोघांच्याही अंगावर.

दोघेही जरा बावरले, पण नंतर एकमेकांकडे पाहून जोरात हसू लागले. अंग भिजल्याने दोघेही कुडकुडत होते, पण चेहऱ्यावर उबदार हसू ठेवतच..!

त्या एका लाटेनं समुद्राकडे परतताना जणू त्यांच्या चेहऱ्यावरचं दुःख पुसून काढत ते सोबत नेलेलं असावं स्वतःबरोबर. असच काहीसं. त्या एका क्षणात त्यांच्या चेहऱ्यावर फुललेले हास्य आताही तसेच होते. सौरभ ला खर तर हे भाव अधिकच भावले आणि म्हणून कि काय त्याने तेवढ्याच उत्साहात पुन्हा रेखाटण्यास सुरुवात केली.

आता त्याच्या चित्रात त्या वृद्ध आजोबाचा हसरा चेहरा तर होताच पण सोबतीला त्यांच्या खांद्यावर डोकं ठेऊन विसावलेली आजी, समोरचा निळा समुद्र, त्यात डुंबायला तयार असलेला सूर्य आणि आणि हो ती लाट देखील…! सौरभने मनमुराद रंगांची उधळण केली होती त्याच्या चित्रात. त्याच्या कुंचल्याचे फटकारे कॅनव्हासवर पडताना तो कुंचला देखील रंगीबेरंगी होऊन भिजून गेला होता. त्या एकाच लाटेने सौरभच्या चित्रात पुन्हा एकदा रंग भरले होते.

सौरभ घरी आला. चहा घेत घेत तो त्याच्या रूममध्ये गेला, खिडकीचे पडदे दूर केले आणि समोरच्या भिंतीवर रेखाटलेल्या दाराच्या चित्राजवळ जाऊन उभा राहिला. एक भलं मोठं दार आणि त्याला लावलेलं कुलूप, असे काहीसे होते ते चित्र.

त्यानं पुन्हा ब्रश आणि कलर पेटी उघडली. हातात ब्रश घेतला आणि भिंतीवर रेखाटलेल्या त्या बंद दारावरील कुलुपाला एक चावी काढली..! दुःखातदेखील लहान लहान गोष्टीत सुख कसं शोधायचं हे त्या वृद्ध आजीआजोबानी सौरभला दाखवून दिल असावं. त्याला आनंदी राहण्याची चावी शोधता आली होती. टेबलवर ठेवलेल्या फ्रेम मधील जुने चित्र काढून त्याने त्यात आज काढलेले हे सुंदर चित्र ठेवले.

हे सर्व बाहेर उभी असलेली सौरभची आई पाहत होती. ती एक चित्रकार नसली म्हणून काय झाले, तिला सर्व काही समजत होते. सौरभ आता हळूहळू पूर्वीसारखा हसून खेळून राहू लागला. त्याने काढलेल्या चित्रांत आता खचाखच भरलेले रंग असायचे, कोंडलेलं असं काही नव्हतं त्याच्या चित्रात आता. सौरभ डिप्रेशनमधून बाहेर पडत होता.

आयुष्यात चढउतार तर येतच राहणार. तुम्ही पण का नाही स्वतःला गुंतवून घेत, तुमच्यातल्या कलेत, आवडीतल्या गोष्टीत, सतत काही ना काही करत राहण्यात ज्यात तुम्हाला पुन्हा एकदा ‘स्वतःला’ शोधता येईल. मग नाही वाटणार एकटे आणि नाही येणार डिप्रेशन…!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)