विचार : डोंट डिप्रेस (भाग-1)

-अमोल भालेराव

आयुष्यात सगळं कसं अगदी छान चाललेलं असतं. पण अचानक असं काही अनपेक्षित घडतं, की आयुष्याची घडी विस्कटून जाते. वाटेला आलेले दुःख कितीही लहान असले तरी ते डोंगराएवढे मोठे वाटू लागते. कोणीतरी तुमच्या चांगुलपणाचा गैरफायदा घेतं, तुम्हाला वापरून फेकून देतं. एकटे पडतो आपण. खायला उठतो हा एकटेपणा.

विचार-अविचारांच्या गोंगाटात वेड लागेल याची भीती वाटू लागते. या एकाकी मनाने त्याचा तळ गाठलेला असतो. विचार करता करता पार खोल आतमध्ये रुतून बसतो आपण. अशा वेळेस काही हात तुम्हाला बाहेर ओढून काढायचा प्रयत्न करतातही, पण परत त्या एकांतात उदासीनता तुमच्यावर झडप घालते आणि पुन्हा तेच.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

जोपर्यंत आपण स्वतःहून हे उदासीनतेचे मळभ पुसून टाकत नाही, तोपर्यंत कितीही हात तुमच्या मदतीला धावून आले तरी ते अपुरेच….! अशीच एक कथा, सौरभची, चला पाहू कसा तो बाहेर पडतो या ‘ डिप्रेशन ‘ च्या जाळ्यातून.

“सौरभ, उठ आता 8 वाजत आलेत.
ऑफिसला जायला उशीर होईल.” आईच्या आवाजाने सौरभला जाग आली. ऑफिसला जाण्यासाठी तयार होऊन आईने केलेला नाश्‍ता न खाताच तो घराबाहेर पडला. सौरभचं असं हे गप्प राहणं, सतत कसल्यातरी विचारात गुरफटणं यामुळे त्याच्या आईच्या जीवाला मात्र घोर लागला होता.

का कुणास ठाऊक, पण आज ऑफिस सुटल्यानंतर सौरभचे पाय चौपाटीकडे वळले. चौपाटीवर फेरफटका मारून तो एका ठिकाणी निवांत बसला. त्या दिवशी नेहमीप्रमाणेच गर्दी होती. कोणी आपल्या कॉलेज ग्रुपबरोबर दंगामस्तीत, कोणी सेल्फी घेण्यात, कोणी आपल्या बाळाला दोन्ही हाताने धरून चालवताना वाळूत उमटलेल्या त्या नाजूक पावलांकडं पाहून हसण्यात, तर कोणी एकमेकांचा हात हाती घेऊन प्रेमाची स्वप्नं पाहण्यात..!

तेवढ्यात सौरभची नजर एका वृद्ध व्यक्तीवर पडली. अंगात मळलेला सदरा, धोती पण ठिकठिकाणी फाटलेली, डोक्‍यावर टोपी, डोळ्यावरील चष्मा एका बाजूने दोऱ्याने बांधलेला. बहुदा त्याची दांडी तुटलेली असावी, पांढरीशुभ्र दाढी आणि पायात झिजलेल्या चपला. दोन्ही गुढगे थोडे वर करत, त्यांना सुरकुतलेल्या हाताने कवेत घेत आणि लुकलुकत्या मानेला काहीसं स्थिर करत ते वृद्ध समुद्राकडे पाहत होते. या थकलेल्या चेहऱ्याला पाहताना सौरभच्या संवेदनशील नजरेने त्या वृद्ध आजोबांचे चित्र मनात कधीच रेखाटलेले होते. आता तो आतुर झाला होता कॅन्वासवर ते चित्र उतरविण्यासाठी.

सॅकमध्ये बरोबर ठेवलेले ब्रश आणि कलर साहित्य त्याने बाहेर काढले. अगदी बारकाईने तो त्यांचं चित्र रेखाटू लागला. आजोबांच्या चेहऱ्यावर एक कारुण्याचा आणि दु:खी भाव होता, तो सौरभला सहज टिपता आला. सौरभला आणि त्याच्या कुंचल्याला देखील सवय झाली होती दुःख रेखाटण्याची ..! तो आता दुसऱ्याच्या आनंदात स्वतःला ठेवून पाहायचा. तो काही दिवसापासून डिप्रेशनमध्ये होता.

विचार : डोंट डिप्रेस (भाग-2)


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)