पंतची धोनीशी तुलना नको – भरत अरुण

नवी दिल्ली: भारतीय वेगवान गोलंदाजांचे प्रशिक्षक भरत अरुण यांनी यष्टिरक्षक ऋषभ पंतची पाठराखण करताना युवा खेळाडूची तुलना दिग्गज महेंद्रसिंग धोनीसोबत होणे योग्य नसल्याचे म्हटले आहे.

यावेळी बोलताना ते म्हणाले की, धोनी महान खेळाडू असून यष्टीमागे त्याची कामगिरी शानदार आहे. विराटला ज्यावेळी गरज भासते त्यावेळी तो धोनीची मदत घेतो. संघावर धोनीचा प्रभाव आहे. त्यामुळे त्याचा अनुभव हा देखील खुप जास्त आहे. त्या मानाने ऋषभ पंत अगदीच नवखा खेळाडू आहे. त्यामुळे ऋषभची तुलना धोनीशी होणे चुकीचे आहे.

तर, केदार जाधवच्या गोलंदाजीबाबत अरुण म्हणाले, जर पाच नियमित गोलंदाजांनी आपले काम चोख बजावले तर त्याची गरज भासणार नाही. केदारने अनेकदा चांगली कामगिरी केली आहे. ज्यावेळी त्याची गरज नसेल त्यावेळी तो गोलंदाजी करणार नाही, असे आम्ही गोलंदाजी विभागाला सांगतो. तर, विजय शंकरबाबत अरुण म्हणाले, “विजयचा आत्मविश्वास उंचावलेला आहे. त्याने कुठल्याही क्रमांकावर शानदार फलंदाजी केली आहे. आम्ही त्याला चौथ्या, सहाव्या आणि सातव्या क्रमांकावर संधी दिली. त्याचा त्याने फायदा उचलला असून उल्लेखनीय कामगिरी करुन दाखवली आहे. तसेच त्याच्या गोलंदाजीतही सुधारणा झाली आहे. त्याच्या फलंदाजीतील आत्मविश्वास त्याच्या गोलंदाजीत दिसतो आहे. सुरुवातीला तो 120-125 किलोमीटर प्रतितास वेगाने गोलंदाजी करीत होता. मात्र, आता तो 130 च्या वेगाने गोलंदाजी करू शकतो. हे संघसाठी फायद्याचे असल्याचेही त्यांनी सांगितले.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)