मुंबई – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे हिमालया पादचारी पूल कोसळून सहा जणांचा मृत्यू झाला असून या दुर्घटनेत ३२ जण जखमी झाले आहेत. या दुर्घटनेवरुन आमदार नितेश राणे यांनी ट्विटद्वारे मुंबई महापालिका आयुक्तांवर निशाणा साधला कि, ‘ज्या वेळी अजॉय मेहता यांनी महापालिकेचा कारभार हाती घेतला तेव्हा त्यांची सुरुवात चांगली राहिली, मात्र आता मेहता यांची कारकीर्द संपुष्टात येत आहे. चांगल्या पदाच्या हट्टापायी मेहता मुंबईकरांच्या सोयी सुविधांकडे दुर्लक्ष करत आहे. त्यामुळे त्यांनी चांगले काम करा अन्यथा पदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी नितेश राणे यांनी केली आहे.
Ajoy Mehta started well as the BMC Chièf but nw his tenure is over n he is just stretching it either for a better posting or till his retirement..that’s y he doesn’t feel the need to perform n that’s why we as Mumbaikers r suffering due to poor administration! Resign or perform!
— nitesh rane (@NiteshNRane) March 15, 2019