डीएनए तंत्रज्ञान नियमन विधेयक लोकसभेत सादर

नवी दिल्ली – केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी आज लोकसभेत डीएनए तंत्रज्ञान (उपयोग आणि वापर) नियमन विधेयक-2019 सादर केले. बेपत्ता व्यक्ती, अज्ञात मृत व्यक्ती, खटले सुरु असलेले आरोपी, आदींची ओळख पटवण्याच्या उद्देशाने डीएनए तंत्रज्ञानाच्या उपयोग आणि वापराच्या नियमनासाठी हे विधेयक आहे, असे डॉ. हर्षवर्धन यांनी हे विधेयक मांडतांना सांगितले.

देशातल्या न्याय व्यवस्थेला मजबूत करण्यासाठी डीएनए आधारित न्यायवैद्यक तंत्रज्ञानाचा वापर विस्तारणे हा या विधेयकाचा मुख्य उद्देश आहे. राष्ट्रीय आणि प्रादेशिक डीएनए डेटा बॅंकांच्या स्थापनेमुळे न्यायवैद्यक तपासाला मदत होईल.

कॉंग्रेसने या विधेयकाला विरोध दर्शवला आहे. “डीएनए’मुळे व्यक्‍तीच्या वैयक्तिक माहितीचा अधिकार धोक्‍यात येईल, असे कॉंग्रेसने म्हटले आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)