जोकोविच उपान्त्य फेरीत दाखल तर राफेल नदालचीही आगेकूच 

रोम  – इटालियन ओपन टेनिस स्पर्धेत शुक्रवारी खेळल्या गेलेल्या उपान्त्यपूर्व सामन्यात जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानी असलेल्या नोव्हाक जोकोविच आणि सध्याचा विजेता राफेल नदाल यांनी दिमाखात उपान्त्य फेरीत प्रवेश केला. जोकोविच याने रोमांचक सामन्यात जुआन मार्टिन डेल पोट्रो याचा पराभव केला. तर नदालने फर्नार्डो वेर्डास्कोला नमवित आगेकूच केली.

जोकोविचने तीन सेटपर्यत झालेल्या संघर्षपूर्ण सामन्यात अर्जेंटिनाच्या जुआन मार्टिन डेल पोट्रोवर 4-6, 7-6 (8-6), 6-4 असा विजय मिळविला. या सामन्यात सर्बियाचा खेळाडू नोव्हाक याने दोन मॅच पॉईट वाचवित दमदार वापसी केली. डेल पोट्रोने पहिला सेट जिंकत दमदार सुरुवात केली होती. पण निर्णायक क्षणी अनुभवी नोव्हाकने आघाडी घेत सामन्यावर पकड मिळविली.

दुस-या सेटमध्ये दोन्ही खेळाडूंना प्रत्येक पॉंईटसाठी संघर्ष करावा लागला. टाय-ब्रेममध्ये गेलेल्या या सेटमध्ये डेल पोट्रो विजयासमिप असताना नोव्हाकने दोन मॅच पॉंईट वाचवित सामन्यात बरोबरी राखली. त्यानंतर जोकोविचने तिस-या आणि निर्णायक सेटमध्ये आपली कामगिरी उंचाविली. या विजयासह त्याने अंतिम चारमध्ये आपले स्थान निश्‍चित केले. आता उपान्त्य फेरीत अर्जेटिनाच्या डिएगो श्‍वाटर्जमन याच्याशी त्याचा सामना होणार आहे.

दुसरीकडे उपान्त्य फेरीत प्रवेश करण्यासाठी नदालला जास्त संर्घष करावा लागला नाही. नदालने स्पेनच्या फर्नार्डो वेर्डास्कोला 6-4, 6-0 असे सहज पराभूत करत आगेकूच केली. सलग चौथ्यांदा उपान्त्य फेरीत प्रवेश करणा-या नदालचा सामना युवा खेळाडू स्टेफनॉस सिसिपास याच्याशी होणार आहे. दरम्यान, गतआठवड्यात झालेल्या माद्रीद ओपनच्या उपान्त्य सामन्यात नदालाला त्याच्याकडून पराभव पत्कारावा लागला होता.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)