घरोघरी साजरी व्हावी दिवाळी ..!

सम्राट गायकवाड

सध्या सर्वत्र दिवाळी सणाची धामधूम सुरू आहे. दिवाळीचा सण धुमधडाक्‍यात, उत्साहात व आनंदाने साजरा करता यासाठी प्रत्येकाची धावपळ सुरू आहे. खरेदीसाठी बाजारपेठा गर्दीने गजबजून गेल्याचे सर्वत्र चित्र आहे. यंदाची दिवाळी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात आल्यामुळे शासकीय तसेच कार्पोरेट कंपन्यांमधील कर्मचारी आणि अधिकाऱ्यांचे बोनस आणि पगार एकत्र झाले आहेत. त्यामुळे त्यांची दिवाळी तर मोठ्या प्रमाणात साजरी होणार हे नक्की आहे. असे सुखावह चित्र एका बाजूला असले तरी दुसऱ्याबाजूला शेतकरी मात्र आर्थिक विवंचनेत असल्याचे दिसून येते.

जिल्ह्यातील पूर्व भागात तर दुष्काळजन्य परिस्थिती निर्माण झाल्यामुळे त्या ठिकाणी पहिला जगण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्याचबरोबर असंघटित क्षेत्रात काम करणाऱ्या कामगारांचे देखील हातावरचे पोट असल्यामुळे त्यांना दिवाळी नावापुरतीच माहिती आहे.

अशीच स्थिती समाजातील गोरगरीब समाजातील माणसे आणि मुलांची आहे. एकूणच दिवसेंदिवस समाजातील आर्थिक स्थितीची दरी अधिक रुंद होत असल्याचे दिसून येत आहे. शासकीय सेवकांना गलेगठ्ठ असलेले पगार, हक्काच्या सुट्ट्या आणि रजा त्याचबरोबर वैद्यकिय उपचार देखील शासन करीत असल्यामुळे आनंदी आनंद आहे. तर दुसऱ्या बाजूला असंघटित कामगारांना अल्प वेतन तर शेतकऱ्याच्या पिकाला जाहीर होवून देखील हमीभाव मिळत नसल्याने कष्टकरी कामगार आणि शेतकऱ्याचे स्थिती हलाखीची झाली आहे. अशावेळी येणारे सणवार साजरे करणे शक्‍य होत नाही अशी स्थिती आहे. अशावेळी समाजातील धनवान मंडळींनी माणुसकी दाखवून समाजातील आर्थिक दृष्ट्‌या दुर्बल व्यक्तींना मदतीचा हाथ देणे गरजेचे आहे.

तसेच दिवाळीच्या काळात ऊसतोड कामगारांच्या झोपडीत देखील दिवाळी साजरी होत नाही. मात्र, कारखानदार संचालकांनी संवेदनशीलता दाखवून कामगारांची दिवाळी आनंदात साजरी होण्यासाठी प्रयत्न करायला हवेत. अशाच प्रकारे बांधकाम कामगार, वाहन चालक, हॉटेल कामगार यासह असंख्य खासगी क्षेत्रात काबाड कष्ट करणाऱ्यांप्रती समाजाने संवेदनशीलता दाखवून हातभार लावणे गरजेचे आहे. त्याच बरोबर निराधार मुलांचे रिमांड होम येथे देखील समाजातील धनवान मंडळींनी मदत केली तर खऱ्या अर्थाने दिवाळी साजरी केल्याचे सुख निश्‍चितपणे प्राप्त होणार आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)