नगरसेवकाची नगरपंचायत कर्मचाऱ्यांना दिवाळी भेट

लोणंद – लोणंद येथील प्रसिद्ध उद्योजक तथा नगरसेवक असलेले राजेंद्र डोईफोडे आणि त्यांचे बंधु शामसुंदर डोईफोडे या दोघा बंधुनी सामाजिक बांधिलकी जपत सालाबाद प्रमाणे यावर्षीदेखील नगरपंचायत कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड केली आहे. नगरपंचायतीच्या 27 महिला कर्मचाऱ्यांना भाऊबीज म्हणून सालाबाद प्रमाणे साडीचोळी भेट दिली तर 13 पुरूष कर्मचाऱ्यांचा पूर्ण पोषाख देऊन सन्मान करण्यात आला.

लोणंदच्या या दोघा बंधुंनी काही महिन्यांपूर्वीच मातेच्या वाढदिवसाच्या निमित्ताने स्वखर्चाने प्रभागातील पथदिवे बसवले होते. आपल्या दातृत्वाने नेहमीच लोणंदकरांच्या मनात आपले वेगळं स्थान निर्माण केले आहे. सामाजिक प्रश्नांची जाणीव ठेवून कायमच भरीव योगदान देणारे डोईफोडे बंधूंचे सर्व स्तरातून कौतुक होतं आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

लोणंदच्या गणेश मंदिरात करण्यात आलेल्या या कपडे वाटप समारंभास श्रीमती लक्ष्मीबाई डोईफोडे, ऍड. बाळसाहेब बागवान, आनंदराव शेळके, मा. नगरघ्यक्षा स्नेहलता शेळके, बाळासाहेब शेळक, दादासाहेब शेळके, श्‍यामसुंदर डोईफोडे, शशिकांत जाधव, ऍड. सदाशिव शेळके, म्हस्कुअण्णा शेळके, बापूराव क्षीरसागर, गोट्या जाधव व नगरपंचायत कर्मचारी वर्ग उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)