घटस्फोटीत पत्नीला मारहाण करणाऱ्याची चांगल्या वर्तवणुकीच्या हमीवर सुटका

पुणे – घटस्फोटीत पत्नीला शिवीगाळ, मारहाण करून तिचा विनयभंग करणाऱ्या पतीची दोन वर्षाच्या चांगल्या वर्तुणूकीच्या हमीवर न्यायालयाने सुटका केली आहे. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी व्ही.बी. पाटील
यांनी हा आदेश दिला आहे. वर्तुणूक न सुधारल्यास एक वर्ष कारावास भोगावा लागेल, असे न्यायालयाने आदेशात नमुद केले आहे.

39 वर्षीय घटस्फोटीत पतीने मारहाण केल्याची तक्रार 40 वर्षीय पत्नीने दिली आहे. ही घटना 16 मे 2018 रोजी सकाळी 7.15 च्या सुमारास घडली. भारती विद्यापीठ भागात दोघांच्या नावावर एक फ्लॅट आहे.
कौटुंबिक न्यायालयाने घटस्फोट मंजुर करताना तो फ्लॅट विकून आलेले पैसे निम्मे-निम्मे घेण्यास सांगितले होते. ती मुंबई येथे राहत होती. तर, तो त्या फ्लॅटमध्ये राहत होता. घटनेच्या वेळी कामानिमित्त ती पुण्यात आली होती. त्यावेळी फ्लॅटच्या विक्रीबाबत त्यास विचारणा करण्यासाठी ती आईसह फ्लॅटवर गेली होती. त्यावेळी “मला फ्लॅट विकायचा नाही’ असे म्हणत त्याने शिवीगाळ, हाताने मारहाण आणि तिचा विनयभंग़ केला. त्यानंतर वडिलांना फोन केला. तिच्याकडे बघत “तुम्हे जिंदा मार दुंगा’ म्हटले. त्यामुळे दोघी भीतीने घराबाहेर पडल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. या प्रकरणात सरकारी पक्षातर्फे सहायक सरकारी वकील विजयसिंह जाधव यांनी काम पाहिले. त्यांनी सहा साक्षीदार तपासले. त्यामध्ये फिर्यादी आणि तिच्या आईची साक्ष महत्त्वाची ठरली. भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनचे पोलीस कर्मचारी सुशांत फरांदे यांनी न्यायालयीन कामकाजात मदत केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)