देवाला ‘जातींमध्ये’ गुंडाळणे अयोग्य : योगींना घरचा आहेर 

बालिया : उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी ‘हनुमान हे आदिवासी होते’ असा शोध लावल्यामुळे त्यांच्यावर चोहीबाजूने टीका होत होती. आता अशातच उत्तर प्रदेशचे आमदार सुरेंद्र सिंघ यांनी देखील योगी आदित्यनाथ यांच्या वक्तव्यावर नाराजी व्यक्त करताना, ‘देव हे संपूर्ण मानवजातीचे असून त्यांना अशाप्रकारे जातींमध्ये गुंडाळणे अयोग्य आहे.’ असे वक्तव्य केले आहे.

तत्पूर्वी योगी आदित्यनाथ यांनी राजस्थानमध्ये एका सभेत बोलताना “बजरंगबली हे भारतीय परंपरेतील एक असे देव आहेत जे वनवासी, गिरवासी, दलित आणि वंचित आहेत.” असे वक्तव्य केले होते. आदित्यनाथांच्या या वक्तव्यानंतर त्यांच्यावर चोहीकडून टीका करण्यात आली होती.

काँग्रेसचे नेते प्रमोद तिवारी यांनी आदित्यनाथांवर खोचक टीका करताना, “आजपर्यंत भाजपने व्यक्ती आणि समाजामध्ये फूट पडल्याचं पाहिलं आहे मात्र आता पहिल्यांदाच देवाची देखील वाटणी केली आहे.” असे वक्तव्य केले होते.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)