भाजपनं तिकीट कापलं; शत्रुघ्न सिन्हा काँग्रेसच्या वाटेवर?

नवी दिल्ली – शत्रुघ्न सिन्हा नेहमीच भाजपावर टीका करत असतात. त्यामुळे लोकसभा निवडणूका जाहीर होण्याच्या आधीपासूनच यंदाच्या निवडणूकीत बिहारमधून सिन्हा यांना तिकीट न देण्याबाबत जोरदार चर्चा सुरू होती. शनिवारी भाजपाने बिहारमध्ये भाजपाची यादी जाहीर केली. यामध्ये खासदार शत्रुघ्न सिन्हांचं भाजपनं तिकीट कापलं असून त्यांच्या जागी पाटणा साहिब मतदारसंघातून केंद्रीय मंत्री रवीशंकर प्रसाद यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यामुळे शत्रुघ्न सिन्हा काँग्रेसमध्ये जाणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे.

पाटणासाहेब मतदारसंघातून केंद्रीय मंत्री रवीशंकर प्रसाद, पाटलीपुत्रमधून रामकृपाल यादव आणि बेगुसरायमधून गिरीराजसिंह यांना उमेदवारी दिली आहे. पाटणासाहेब मतदारसंघात यापूर्वी शत्रुघ्न सिन्हा हे उमेदवार होते. सतत पक्षविरोधी वक्तव्यांमुळे सिन्हांना उमेदवारी नाकारल्याचे बोलले जात आहे.

शत्रुघ्न सिन्हा नेहमीच भाजपावर टीका करत असतात. कधी एखाद्या मंचावरून तर कधी सोशल मीडियावरून भाजपाच्या धोरणांवर आणि पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांवरही टीका कत असतात. आता भाजपाने तिकीट कापल्यानंतर शत्रुघ्न सिन्हा काँग्रेसमध्ये प्रवेश करणार, अशी चर्चा आहे. तर काँग्रेसच्या एका नेत्याने 24 किंवा 25 मार्चला शत्रुघ्न सिन्हा काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याचे सांगितले.

तर दुसरीकडे भाजपाचे प्रवक्ते शाहनवाज हुसैन यांचे तिकीटही कापण्यात आले आहे. शाहनवाज हुसैन यांनी गेल्या निवडणुकीत भागलपूर येथून निवडणूक लढवली होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)