पुणे – प्रसन्न खेडेकर, सार्थक थत्ते, अनिकेत चव्हाण, आर्या राजगुरू यांनी पुणे जिल्हा हौशी ऍक्वेटिक संघटनेच्या वतीने आयोजित कै.रमेश दामले स्मृती जिल्हा अजिंक्यपद जलतरण स्पर्धेत आपापल्या गटातून सुवर्णपदक पटकावले.
या स्पर्धेत एकूण 750हून अधिक खेळाडू सहभागी झाले आहेत. ही स्पर्धा 6, 8, 10, 11, 14, 17 मुले आणि मुली, तसेच वरिष्ठांच्या खुल्या गटात 148 प्रकारांत स्पर्धा होत आहे.
स्पर्धेचे उद्घाटन गुरुवारी जिल्हा क्रीडा अधिकारी विजय संतान यांच्या हस्ते झाले. यावेळी पुणे जिल्हा हौशी ऍक्वेटिक संघटनेचे अध्यक्ष धनंजय दामले, उपाध्यक्ष शैलेश टिळक, शशांक कुलकर्णी, सचिव जय आपटे, कोषाध्यक्ष नीता तळवलीकर, कार्याध्यक्ष अजित सोहोनी, सहसचिव अमित गोळवलकर, शौर्य करंदीकर आदी उपस्थित होते.