मतदार यादी पुनरिक्षणाचा जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला आढावा

पुणे – मतदारयादी पुनरिक्षणाचा जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी एका बैठकीत मतदारसंघनिहाय आढावा घेतला. या बैठकीला उपजिल्हा निवडणूक अधिकारी मोनिका सिंह, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. जयश्री कटारे, उपविभागीय अधिकारी ज्योती कदम, उपविभागीय अधिकारी स्नेहल बर्गे, तहसीलदार उपस्थित होते.

एक जानेवारी 2019 या अर्हता दिनांकावर आधारित, 1 सप्टेंबर ते 30 ऑक्‍टोबर, 2018 या कालावधीत छायाचित्र मतदार यादीचा विशेष पुनरिक्षण कार्यक्रम निवडणूक विभागातर्फे हाती घेण्यात आला होता. जिल्ह्यातील नवमतदारांची संख्या वाढविण्यासाठी फॉर्म क्रमांक 6,7,8 व 8अ वाटप करून, आलेले फॉर्म या मोहिमेमध्ये जमा करून घेण्यात आले होते. तसेच ऑक्‍टोबरमधील प्रत्येक रविवारी सर्व मतदान केंद्रांवर मतदार नोंदणीसाठी विशेष मोहीम राबविण्यात आली होती.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

नवल किशोर राम यांनी शनिवारी याचा आढावा घेऊन संबंधित अधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले. याच बैठकीत अस्थिव्यंग मतदारांसाठी तळमजल्यावर मतदान केंद्राची स्थापना करणे, मतदार यादीत नाव नोंदणीसाठी प्राप्त अर्ज, त्यावर केलेली कार्यवाही याचा मतदारसंघनिहाय आढावा घेतला. आगामी निवडणुकांच्या पार्श्‍वभूमीवर मतदान यंत्र हाताळणीबाबत प्रशिक्षणासाठी सर्व संबंधित अधिकाऱ्यांनी तयार राहण्याची सूचनाही त्यांनी या बैठकीत केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)