सातारा: जिल्हा परिषदेचा नावलौकिक देशभरात पोहचवणारे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा सीईओ कैलास शिंदे यांची पालघर जिल्हाधिकारीपदी नियुक्ती करण्यात आली आहे. शिंदे यांच्या ठिकाणी एस. एम.भागवत (अति. जिल्हाधिकारी, एम.एम.आर.डी. ए, मुंबई यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
दरम्यान, शिंदे यांनी सातारा जिल्हा परिषदेच्या मुख्यकार्यकारी अधिकारी पदाची सूत्रे दोन वर्षा पूर्वी हाती घेतली होती. तेव्हापासून त्यांनी शिक्षण, आरोग्य आणि विशेषतः स्वच्छतेवर भरीव कार्य केले होते. त्यामुळेच स्वच्छ भारत अभियानात सातारा जिल्हापरिषदेचा देशात प्रथम क्रमांक पटकाविता आला. त्याच बरोबर केंद्र सरकारच्या स्वच्छ व सुंदर शौचालय स्पर्धेत देखील सातारा जिल्हा परिषदेने भरीव कार्य केल्याबद्दल नुकतेच दिल्ली येथे गौरव करण्यात आला होता.