पुणे – मिहीर आंब्रे, साध्वी धुरी यांनी पुणे जिल्हा हौशी ऍक्वेटिक संघटनेच्या वतीने आयोजित कै. रमेश दामले स्मृती जिल्हा अजिंक्यपद जलतरण स्पर्धेत सुवर्णपदक पटकावले.
टिळक जलतरण तलावावर सुरू असलेल्या या स्पर्धेत मिहीर आंब्रेने मुलांच्या खुल्या गटात 50 मीटर फ्रीस्टाइल प्रकारात सुवर्णपदक पटकावले. त्याने 23.76 सेकंद वेळ नोंदवली. श्वेजल मानकरने 24.89 सेकंद वेळ नोंदवून रौप्य, तर साहिल पवारने 24.89 सेकंद वेळ नोंदवून ब्रॉंझपदक पटकावले. याआधी मिहीरने खुल्या गटात 50 व 100 मीटर बटरफ्लायमध्ये सुवर्णपदक मिळवले आहे. त्याचबरोबर मिहीरने 100 मीटर फ्रीस्टाइलमध्येही सुवर्णपदक पटकावले होते.
यानंतर मुलींच्या खुल्या गटात हार्मोनी क्लबच्या साध्वी धुरीने 28.56 सेकंद वेळ नोंदवून सुवर्णपदक पटकावले. संजना पालाने 29.66 सेकंद वेळ नोंदवून रौप्य, तर शरॉन शाजूने 29.91 सेकंद वेळ नोंदवून ब्रॉंझपदक मिळवले. याधी साध्वीने खुल्या गटात 100 मीटर बटरफ्लायमध्ये व 100 मीटर फ्रीस्टाइलमध्ये सुवर्णयश मिळवले होते.