राष्ट्रपतींच्या हस्ते संगीत नाटक पुरस्कारांचे वितरण

नवी दिल्ली : राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते आज राष्ट्रपती भवनात झालेल्या कार्यक्रमात संगीत नाटक अकादमी पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. यावेळी प्रख्यात बासरी वादक राजेंद्र प्रसन्ना, कथक नृत्यांगना शोभा कोसर, लोकगीत गायक अन्वर खान मंगनीयार, ओडिसी डान्सर सुजाता मोहपात्रा, यांच्यासह अन्य मान्यवरांना संगीत नाटक अकादमी पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले.

यावेळी एकूण 42 कलाकारांना हे पुरस्कार प्रदान करण्यात आले. सन 2017 सालचे हे पुरस्कार आहेत. शास्त्रीय गायिका ललित जे राव, तबला वादक योगेश समसी, एम. एस. शीतल, सुषमा सुधिंद्र, तिरूवरूर वैद्यनाथन, शशांक सुब्रमण्यम, मधुराणी आणि हैमंती शुक्‍ला, गुरूनामसिंग, यांना हे पुरस्कार प्रदान करण्यात आले. नृत्य क्षेत्रातील योगदानाबद्दल ज्यांना सन्मानीत करण्यात आले त्यात मदाम्बी सुब्रमण्यम नंबुदिरी, आय. एन ओईनाम, दीपिका रेड्डी, रामकृष्ण तालुकदार, जन्मजोय साईबाबू, आशित देसाई यांचा समावेश आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)