बसस्थानकाच्या प्रवेशद्वाराला अवकळा

जीर्ण झालेल्या स्लॅबचे पडताहेत तुकडे, दुर्घटनेचीही शक्‍यता

सातारा – सातारा बसस्थानकाच्या प्रवेशद्वारावरच असलेल्या पोर्चच्या एका बाजूचा भाग जीर्ण झाल्यामुळे स्लॅबचे तुकडे खाली पडत आहेत. तसेच पोर्चच्या झालेल्या या दुरवस्थेमुळे बसस्थानकाच्या प्रवेशद्वाराला एकप्रकारची अवकळाच प्राप्त झाली आहे. दरम्यान, पोर्चचा स्लॅब जीर्ण झाल्याने दुर्घटनेचीही शक्‍यता नाकारता येत नाही. त्यामुळे एसटी प्रशासनाने तातडीने या पोर्चची डागडुजी करण्याची गरज निर्माण झाली आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

सातारा हे जिल्ह्याचे ठिकाण असल्यामुळे याठिकाणी येणाऱ्या नागरिकांची संख्याही मोठी आहे. विशेष म्हणजे ग्रामीण भागातून येणारे सरार्स नागरिक सातारला येत असताना एसटीनेच येतात. जिल्ह्याचे ठिकाण असल्याने येथील बसस्थानकही मोठे भव्य आहे. याशिवाय बसस्थानकाच्या शोभेसाठी तसेच प्रवाशांच्या सोयीसाठी एसटी प्रशासनाने वारंवार ठोस पावले उचलत योग्य ती कामेही केली आहेत. नुकतेच बसस्थानकात विविध ठिकाणी नूतनीकरण करण्यात आले आहे. मात्र, एसटी प्रशासनाच्या नजरेतून नेमके बसस्थानकाचे प्रवेशद्वार सुटले आहे. प्रवेशद्वारावर असलेल्या पोर्चचा एक कोपरा जीर्ण झाल्यामुळे स्लॅब दुभंगला आहे. तसेच तेथून सिमेंटचे तुकडेही पडत आहेत.

पोर्चच्या या दुरवस्थेमुळे बसस्थानच्या प्रवेशद्वाराला अवकळा प्राप्त झाल्याचे स्वरुप तर आलेच आहे. याशिवाय स्लॅबचे बारीक तुकडे पडत असल्याने दुर्घटनेचीही शक्‍यता निर्माण झाली आहे. स्लॅबचा तुकडा कोसळून प्रवाशाच्या जीवालाही हानी पोहचू शकते. त्यामुळे कोणतीही दुर्घटना घडण्याआधीच एसटी प्रशासनाने प्रवेशद्वारावर असणाऱ्या या पोर्चचा दुभंगलेल्या स्लॅबची तात्काळ दुरुस्ती करण्याची गरज निर्माण झाली आहे.

प्रवाशांच्या जीवाशी खेळ नको

बसस्थानकाच्या प्रवेशद्वावर असलेल्या पोर्चचा स्लॅब एका कोपऱ्यावर दुभंगला आहे. दुदैवाने स्लॅबचा एखादा मोठा तुकडा बसस्थानका जाणाऱ्या किंवा बसस्थानकातून बाहेर येणाऱ्या प्रवाशाच्या अंगावर पडल्यास मोठी दुर्घटनाही घडू शकते. त्यामुळे वेळीच दक्षता घेऊन एसटी प्रशासनाने या स्लॅबची दुरुस्ती करुन प्रवाशांच्या जीवाशी सुरु असलेला खेळ थांबवावा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)