नुकसान भरपाईपोटी सव्वातीन लाख देण्याचे आदेश

ग्राहक मंच : युनायटेड इंडिया इन्शुरन्सला कंपनीला दणका

नगर – दुधाच्या टॅंकरला झालेल्या अपघाताच्या नुकसान भरपाईपोटी युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनीने टॅंकरमालकाला सव्वातीन लाख रुपये द्यावेत, या रकमेवर नऊ टक्के व्याज द्यावे, असा आदेश जिल्हा ग्राहकमंचाचे अध्यक्ष व्ही. सी. प्रेमचंदानी यांच्यासह अन्य सदस्यांनी दिले आहेत.

-Ads-

याबाबतची अधिक माहिती अशीः नेवासे तालुक्‍यातील हिंगणी येथील संतोष दहातोंडे यांच्या दूध वाहतुकीच्या टॅंकरचा विमा युनायटेड इन्शुरन्स कंपनीकडे काढला होता. त्यांच्या एम. एच. 17 टी 4618 या टॅंकरचा मुंबई-नाशिक रस्त्यावरील कसारे घाटात अपघात झाला होता. त्यात टॅंकरचे मोठे नुकसान झाले. दहातोंडे यांनी विम्याच्या रकमेच्या नुकसान भरपाईपोटी विमा कंपनीकडे दावा केला होता; परंतु या कंपनीने टॅंकरमध्ये प्रवासी होते, त्यामुळे विमा पॉलिसीतील अटींचा भंग झाल्याचे कारण दाखवून नुकसान भरपाई द्यायला नकार दिला.

त्याविरोधात दहातोंडे यांनी ऍड. गोरक्ष पालवे यांच्यामार्फत जिल्हा ग्राहक तक्रार व निवारण मंचाकडे दावा दाखल केला. या दाव्याच्या सुनावणीच्या वेळी ऍड. पालवे यांनी अपघाताच्या वेळी विमा वैध होता, अवैध प्रवासी वाहतूक व विमा पॉलिसीचा संबंध नसल्याचे दाखवून दिले. नुकसान भरपाई व अन्य बाबी वेगवेगळ्या आहेत, हे त्यांनी सिद्ध केले. अपघातग्रस्त टॅंकरच्या नुकसानीपोटी भरपाई मिळण्याचा हक्क कायदेशीर असल्याचा त्यांचा युक्तिवाद ग्राहक मंचाने ग्राह्य धरला.

जिल्हा ग्राहकमंचाचे अध्यक्ष प्रेमचंदानी, सदस्य व्ही. एम. डोंगरे, एम. एन. ढाके यांनी युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनीने टॅंकरच्या नुकसान भरपाईपोटी तीन लाख दोन हजार 257 रुपये, दहातोंडे यांना झालेल्या मानसिक त्रासापोटी वीस हजार रुपये तसेच तक्रारीच्या खर्चापोटी तीन हजार रुपये देण्याचा आदेश दिला. नुकसान भरपाईच्या रकमेवर नऊ टक्‍के व्याज देण्याचे या आदेशात नमूद करण्यात आले आहे. ऍड. पालवे यांना ऍड. ए. बी. शेख, बी. बी. गर्जे, दीपक राऊत यांनी मदत केली.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)