कोपरगाव – तालुक्‍यातील जेऊर कुंभारी येथील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या तीन लॉक तोडून अज्ञात चोरट्याने उचकापाचक केली. मात्र बॅंकेचा सायरन वाजल्याने चोरट्यांना मोकळ्या हाताने पळून जावे लागले. जेऊर कुंभारी येथे जिल्हा सहकारी बॅंकेची शाखा आहे. गुरूवारी 16 ऑगस्ट रोजी सायंकाळी 7.15 सुमारास कामकाज संपल्यानंतर व्यवस्थापक व कर्मचारी बॅंक बंद करून घरी गेले.

शुक्रवारी 17 ऑगस्ट रोजी पहाटे साडेतीन वाजण्याच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी बॅंकेच्या समोरील तीन लॉक तोडून आत प्रवेश करून ड्रॉव्हरची उचकापाचक केली. मात्र याच दरम्यान बॅंकेचा सायरन मोठ्याने वाजल्याने चोरट्यांनी तेथून पळ काढला. बॅंकेच्या सीसीटीव्ही फुटेज तपासले असता एक अनोळखी व्यक्‍ती कानटोपी, तोंड रूमालाने बांधलेला अंगात लाईनिंगचा पलशर्ट घातलेला अंदाजे 30 वयाचा दिसून येत आहे.

तसेच सायरनचा मोबाईलवर कॉल असल्याने कर्मचाऱ्याने बॅंकेकडे धाव घेतली असता.चोरट्यांनी बॅंक फोडल्याचे लक्षात आले. याप्रकरणी बॅंकेचे व्यवस्थापक वामन किसन सातदिवे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्यांच्या विरोधात कोपरगाव शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव यांच्या मार्गदर्शनाखानी पोहेकॉ. शेलैंद्र ससाणे करीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)