मध्यप्रदेशात मंत्रिपद न मिळाल्याने नाराज समाजवादी पार्टीच्या वेगळ्या वाटा

संग्रहित छायाचित्र....

लखनौ (उत्तर प्रदेश): मध्यप्रदेशात मंत्रिपद न मिळाल्याने नाराज समाजवादी पार्टीने वेगळ्या वाटा धरण्याचा निर्णय घेतला आहे. मध्य प्रदेशात सपा-बसपाने कॉंग्रेसला बिनशर्त पाठिंबा दिला. मात्र कॉंग्रेसने सपा-बसपाला मंत्रिपद दिले नाही. असे करून कॉंग्रेसने उत्तर प्रदेशात आमचा मार्ग मोकळा केला आहे, असे सपाचे अध्यक्ष आणि उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी मीडियाशी संवाद साधताना संगितले.

मध्य प्रदेशात कोंग्रेसला 214, सपाला 1 आणि बसपाला 2 जागा मिळाल्या होत्या, भाजपाला सत्तेबाहेर ठेवण्यासाठी सपा-बसपा कॉंग्रेसला बिनशर्त पाठिंबा देत असल्याचे मायावती यांनी म्हटले होते. पण कॉंग्रेसच्या कृतीने मायावती यांनीही कॉंग्रेसचे वर्तन गर्विष्ठपणाचे असल्याचा शेरा मारला होता.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

कॉंग्रेसच्या या कृतीनंतर अगोदर मायावती आणि आता अखिलेश यादव यांच्या वक्तव्याने उत्तर प्रदेशात सपा-बसपा कॉंग्रेसपासून वेगळे राहणार असल्याचे उघड झाले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)