दिशा पाटनीने स्वःताचीच उडविली खिल्ली

बॉलीवूड अभिनेत्री दिशा पाटनी ही बीटाउनमधील सर्वात फिट आणि सुंदर असा बांधा असलेल्या कलाकारांपैकी एक आहे. तिच्यासारख्या बांधा आपलाही असावा अशी तिच्या चाहत्यांसह अनेक मुली-महिलांना वाटते. पण दिशाने स्वःतच आपल्या फिगरबाबत खिल्ली उडविली असल्याने सर्वांना आर्श्‍चय वाटत आहे.

त्याचे झाले असे की, दिशाने आपल्या इंस्टाग्रामवर दोनो फोटो शेअर केले आहेत. यात ती आदित्य रॉय कपूर आणि क्रू मेंबर्ससोबत एका स्विमिंग पूल दिसत आहे. यावेळी तिने डायविंग सूट घातलेला आहे. दिशाने फोटो शेअर करत स्वःतला मुर्ख असल्याचे सांगत त्याचे कारण दिले. तिने लिहिले की, जेव्हा तीन दिवस तुम्ही चीट मील खाल, तेव्हा तुम्ही बटाट्यासारखे दिसणारच.

यावरून दिशाने डायट सोडले असून ती तीन दिवसांपासून खाण्यावर ताव मारत असल्याचे स्पष्ट होते. ज्याचा परिणाम तिच्या फिगरवर झाला आहे. दुस-या फोटोबाबत दिशाने चाहत्यांना सांगितले की, हा फोटो स्विमिंग ट्रेनिंगचा असून तो “मलंग’ चित्रपटासाठीचा आहे.

दरम्यान, “मलंग’ हा एक रोमांटिक हॉरर चित्रपट आहे. मोहित सूरी त्याचे दिग्दर्शन करणार आहे. या चित्रपटात आदित्य आणि दिशाशिवाय अनिल कपूर आणि कुणाल खेमूही महत्त्वाची भूमिका साकारणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)