पायाचे धोकादायक विकार( भाग १)

डाॅ. चैतन्य जोशी

हृदयविकार किंवा तत्सम गंभीर विकार होऊ नये म्हणून आपण सगळेच जण वेळोवेळी काळजी घेत असतो. पण समजा आपल्या पायाला काही झालं तर मात्र आपलं त्याकडे दुर्लक्ष होतं. पण तुम्हाला माहिती आहे का, कधी कधी पायाला सूज येणं, किंवा अगदी चप्पल चावणंदेखील महागात पडू शकतं. याचं एक प्रमुख कारण म्हणजे त्याविषयी आपल्यात असलेला जागरूकतेचा अभाव…

पायांच्या रक्‍तवाहिन्यांमध्ये अडथळा आल्यास, त्या भागाचा रक्‍तपुरवठा कमी होतो आणि ग्रेंग्रीन व्हायची शक्‍यता बळावते. पायांचा किंवा शरीरातल्या कुठल्याही रक्‍तवाहिन्यांचा कडकपणा आणि त्यामुळे हळूहळू तिथं कमी होत जाणारा रक्‍ताचा पुरवठा ही मधुमेही रुग्णांसाठी एक प्रमुख चिंतेची बाब असते. बरीच वर्षे मधुमेह असल्यामुळे जसा मज्जातंतूवर परिणाम होतो, तसाच रक्‍तवाहिन्यांवरही होतो.

सामान्य माणसांमध्येसुद्धा वयोमानाने रक्‍तवाहिन्यांचा कडकपणा होतोच, पण मधुमेहीमध्ये याचे प्रमाण 2-3 पटींनी जास्त असतं. पायांच्या रक्‍तवाहिन्यांमध्ये दोष निर्माण झाल्यास त्याला ‘पॅड’ असे म्हणतात. रुग्णाला जेव्हा पॅड झाल्याचे निदर्शनास येते, तेव्हा हृदय व मेंदूच्या रक्‍तवाहिन्यांवरही परिणाम झालेला असतोच.

पॅडचे धोकादायक मुद्दे : मधुमेहाशिवाय दुसऱ्या काही बाबीसुद्धा रक्‍तवाहिन्यांचा विकास वाढविण्यास कारणीभूत असतात. सिगारेट ओढणे किंवा तंबाखूचे सेवन करण्यामुळे रक्‍तवाहिन्यांवर अतिशय वाईट परिणाम होतो आणि मधुमेही रुग्णाने त्याचे सेवन केल्यास हा दोष अतिशय जलद गतीने वाढतो. रक्‍तातील मेद किवा कोलेस्ट्रॉलचे वाढलेले प्रमाण. याचबरोबर वाढलेले रक्‍तदाबसुद्धा मधुमेहींमध्ये हा दोष अतिशय जलद गतीने वाढवतात. रक्‍तवाहिन्यांच्या डॉलर तपासणीतून हा दोष सहज दिसून येतो.रक्‍तवाहिन्यांची एंजिओग्राफी या तपासणीमुळे याचे 100% निदान शक्‍य होते.

हृदयविकार हा शब्द ऐकला की आपल्याला धडकी भरते. त्यामुळे हृदयविकार होऊ नये म्हणून आपण आधीपासूनच काळजी घेतो. कारण त्याची तीव्रता आपल्याला सगळ्यांनाच चांगल्या प्रकारे जाणवते. मात्र त्या मानाने पायाच्या विकारांचं गांभीर्य तितकंसं कोणाच्या लक्षात येत नाही. काही मोजकीच मंडळी याबाबत जागरूक असतात, असं म्हटलं तरीही चालेल. पण पायाला काहीही झालं आणि त्याकडे दुर्लक्ष केलं तर हृदयविकाराप्रमाणेच पायाचे विकारही अतिशय धोकादायक ठरू शकतात. या गोष्टीच्या तीव्रतेची कोणाला कल्पना नसल्याने वेळेवर निदान होत नाही. आणि वेळेवर निदान झालं नाही की पायाचे आजार अंतिम टप्प्यांपर्यंत पोहोचतात.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

पायाच्या विकारात नेमकं काय होतं?

हृदयविकाराप्रमाणेच पायातील नसांमध्ये ब्लॉकेज निर्माण झाल्याने पायाचे विकार संभवतात. पन्नाशी उलटलेल्या व्यक्तींना मधुमेह असेल, तसंच ही मंडळी धूम्रपान करत असतील तर त्यांच्यामध्ये पेरीफेरल व्हॅस्क्‍युलर डिसीज विकसित होण्याचा धोका अधिक संभवतो आणि पायाचा आजार हा त्यापैकीच एक लक्षण आहे. पायाचा विकार हा हृदयविकाराची संभावना दर्शवतो. भविष्यामध्ये हृदयविकाराचा झटका येण्याची किंवा अवयव कापून काढण्याची वेळ येऊन ठेपते. पेरीफेरल व्हॅस्क्‍युलर डिसीजवर काम करणाऱ्या अनेक तज्ज्ञ डॉक्‍टरांच्या म्हणण्यानुसार यात धोक्‍याची पातळी अधिक असली तरी बऱ्याच केसेसमध्ये आजार अंतिम टप्प्यांपर्यंत पोहोचेपर्यंत निदानच झालेलं नसतं.

मधुमेही रुग्णांना इस्पितळात दाखल करावं लागण्यामागे पायाची समस्या महत्त्वाची असते. यासाठी वर्षाला करोडो रुपयांचा खर्च होत असून विकृती निर्माण होण्याचं तसंच मृत्यूचं प्रमाणही खूप आहे. पायाचं दुखणं खूपच गंभीर असून यामुळे रुग्णाचे जीवन व अवयव धोक्‍यात येतो. पायाच्या शिरांमध्ये ब्लॉकेज निर्माण झाल्यामुळे ही समस्या निर्माण होते. रुग्णाच्या हृदयातील शिरा किंवा नसा ब्लॉक होतात तेव्हा हृदयविकाराचा झटका येतो. यावरून हेच दिसून येतं की रुग्णाच्या उर्वरित शरीरामध्ये अशा प्रकारे ब्लॉकेज निर्माण होण्याचं प्रमाण 30 टक्के इतकं असतं, मात्र पायातील नसांमध्ये ब्लॉकेज निर्माण झाल्यास रुग्णाच्या उर्वरित शरीरामध्ये अशा प्रकारे ब्लॉकेज निर्माण होण्याची शक्‍यता 60 ते 70 टक्के इतकी असते.

पायाचे धोकादायक विकार( भाग २)


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)