पायाचे धोकादायक विकार( भाग २)

पायाचे धोकादायक विकार( भाग १)

डाॅ.चैतन्य जोशी

हृदयविकार किंवा तत्सम गंभीर विकार होऊ नये म्हणून आपण सगळेच जण वेळोवेळी काळजी घेत असतो. पण समजा आपल्या पायाला काही झालं तर मात्र आपलं त्याकडे दुर्लक्ष होतं. पण तुम्हाला माहिती आहे का, कधी कधी पायाला सूज येणं, किंवा अगदी चप्पल चावणंदेखील महागात पडू शकतं. याचं एक प्रमुख कारण म्हणजे त्याविषयी आपल्यात असलेला जागरूकतेचा अभाव…

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

लवकर झालेले निदान आणि वाढती जागरुकता यामुळे पायाचं दुखणं कमी होण्यास मदत होते. रुग्णाने तज्ज्ञ व्हॅस्क्‍युलर सर्जनची मदत घेतली तर योग्य औषधे आणि साधी जीवनशैली यांच्या मदतीने सुरुवातीच्या टप्प्यामध्ये यावर सहज उपचार करता येतात. इमेजिंग टेक्‍निकच्या मदतीने कलर डॉप्लर टेस्टचा वापर करून रक्तवाहिन्यांच्या आतील स्थिती पाहता येते आणि याचं निदान करता येतं. 15 टक्के मधुमेहाच्या रुग्णांमध्ये पायाची गंभीर समस्या केव्हा ना केव्हा निर्माण होते. ज्यामुळे संबंधित अवयवाला धक्का पोहोचतो व व्यक्तीचे संपूर्ण जीवन बदलून जाते.

मधुमेहामध्ये संबंधित अवयवाचे विच्छेदन करावं लागण्याचा धोका अधिक असतो. मोठया प्रमाणावर हे रुग्ण न्यूरोपॅथीशी संबंधित असतात आणि त्यामुळे वेदना सहन करण्याची क्षमता कमी झालेली असते. अशा रुग्णांना कळत न कळतपणे पायाला जखमा होतात, उदा. चप्पल चावणे. यात वेदना होत नसल्याने डॉक्‍टरकडे वेळेवर जाणं होत नाही. अवयव गमावणाऱ्या अशा रुग्णांची संख्या लक्षणीय असून सुरुवातीला काळजी न घेतल्याचे हे परिणाम आहेत.

अशा प्रकारे आपण पायाच्या समस्यांना आमंत्रण देत असून मधुमेहामुळे तसेच धूम्रपानामुळे या समस्या अधिकच गंभीर होतात. आपल्याकडे अशा प्रकारच्या पायाच्या समस्यांबाबत जागरूकता फारच कमी दिसून येते. मधुमेह झालेल्या लोकांमध्ये जखमा भरून बऱ्या होण्याचं प्रमाण खूपच कमी असतं. कमी झालेला रक्तप्रवाह, जखमा बऱ्या होण्याचं मंदावलेलं प्रमाण या लोकांमध्ये दिसून येते.

मधुमेह असलेल्या रुग्णांमध्ये अवयवाचे विच्छेदन करण्याचे प्रमाण 50 टक्के असून सामान्यांच्या तुलनेत ते 40 पटीने अधिक आहे. बलून आणि स्टेंटिंगमुळे साधारणपणे इन्व्हेसिव्ह सर्जरीची जागा घेता येते. इंटरव्हेन्शनल रेडिओलॉजिस्ट अरुंद किंवा ब्लॉक झालेली रक्तवाहिनी उघडण्यासाठी इंटरव्हेन्शनल रेडिओलॉजिस्ट बलूनचा वापर करतो आणि काही वेळा याकरता स्टेन्टचा वापर केला जातो.

पायाच्या आजारातील काळजी

 • चालण्याचं अंतर वाढवा.
 • पायाची जखम किंवा गॅंगरीन यावर त्वरीत उपचार घ्यावेत.
 • अशा प्रकारच्या आजारात हार्टअटॅक किंवा स्ट्रोक येणार नाहीत याची काळजी घ्यावी लागते. म्हणून शक्‍यतो धूम्रपान करणं टाळावं.
 • सकस आहार घ्यावा जेणेकरून रक्तातील कोलेस्टेरॉलची पातळी कमी करण्यास मदत होते.
 • मधुमेह, लिपिड लेव्हल आणि रक्तदाब नियंत्रणात कसा राहिल याकडे लक्ष देणं आवश्‍यक आहे.
 • पायाची समस्या निर्माण होताना पहिल्या टप्प्यातील लक्षणं
  चालताना पायात पेटके येऊन चालण्याचे अंतर कमी होणे.
 • पाय बधीर होणे.
 • पाय थंड पडणे.
 • पायांवरचे केस कमी होणे आणि नखं बारीक होऊन तुटणे.
 • आराम केल्यावर पाय दुखायचे थांबणे हे पायाच्या वाहिन्यांमध्ये ब्लॉकेज असल्याचे दुसरे लक्षण आहे.
 • बैठी आणि तणावपूर्ण शहरी जीवनशैली.

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)