अमेरिकेबरोबरच्या चर्चेने नुकसानच होईल 

इराणच्या सर्वोच्च नेत्याची स्पष्टोक्ती

तेहरान – अमेरिकेबरोबर वाटाघाटी केल्यामुळे इराणचा कोणताही फायदा होणार नाही. उलट झाले तर धार्मिक नुकसानच होईल असे इराणचे सर्वोच्च नेते अयातोल्ला अली खामेनी यांनी म्हटले आहे. खामेनी यांनी देशाला उद्देशून केलेल्या 7 पानी निवेदनाचे राष्ट्रीय टिव्हीवरून वाचन करण्यात आले. अमेरिकेच्या नेतृत्वाखाली मध्यपूर्वेतील वरसॉ येथे होणाऱ्या बैठकीच्या पार्श्‍वभुमीवर खामेनी यांनी हे निवेदन केले आहे. इराणमधील इस्लामिक रिपब्लिकला डोळ्यासमोर ठेवूनच अमेरिकेने या बैठकीचा घाट घातला आहे, अशी टीका खामेनी यांनी केली आहे.

अमेरिकेसाठी कोणत्याही मुद्दयावरील ठराव काय असेल याची कल्पना करता येऊ शकत नाही. हा वाटाघाटीतून केवळ नुकसानच होईल. या वाटाघाटी म्हणजे अक्षम्य चूक असेल. या वाटाघाटी म्हणजे शत्रूच्यासमोर गुडघ्यांवर चालत जाणे आणि लांडग्याच्या पंजाचे चुंबन घेण्यासारखे आहे. अशा शब्दांमध्ये खामेनी यांनी अमेरिकेच्या बैठकीवर टीका केली.

यापूर्वी 2015 मध्ये इराण आणि अमेरिकेतील चर्चेला खामेनी यांनी मंजूरी दिली होती. तेंव्हाच्या चर्चेनंतर इराणबरोबर आण्विक करार झाला होता. या करारामुळे इराणला युरेनियम समृद्ध करण्यावर बंधन स्वीकारावे लागले. त्याबदल्यात इराणवरील निर्बंध शिथील केली जाणार होती. मात्र हा करार अमेरिकेचे तत्कालिन अध्यक्ष बराक ओबामा यांच्या कार्यकाळात झाला होता. वर्तमान अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी निवडणूकीपूर्वीपासून अमेरिकेने या करारातून माघार घेण्याचे सूतोवाच केले होते. त्यानुसार अमेरिकेने या करारातून माघार घेतली. त्यामुळे इराणवर पुन्हा आर्थिक निर्बंधही आली आहेत.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)