विखे-गांधी चर्चेत “भाजप’ केंद्रस्थानी! ; बंद खोलीत पाऊणतास चर्चा 

 विखेंनी साधला गांधी समर्थकांशी संवाद

नगर: कॉंग्रेसचे स्टार प्रचारक विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी बुधवारी रात्री खासदार दिलीप गांधी यांची त्यांच्या घरी जाऊन भेट घेतली. विखे पाटील-खासदार गांधी या दोघांमध्ये पाऊणतास बंद खोलीत चर्चा झाली. विखे पाटील यांनी भेटीत राजकीय चर्चे झाली नसल्याचे सांगितले. “या भेटीत राजकीय करिअरवर चर्चा झाल्याचे सांगून, चर्चेत भाजपच केंद्रस्थानी होता,’ असा दुजोरा खासदार गांधी यांच्याकडून मिळाला आहे.

विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी खासदार दिलीप गांधी यांची भेट घेतल्याने नगरच्या राजकारणामधील अनेक धुरंधरांच्या भुवाय उंचविल्या. विखे पाटील यांची ही खासदार गांधींची अचानक भेट होती. विखे पाटील यांचे पुत्र डॉ. सुजय विखे पाटील यांना भारतीय जनता पक्षाकडून नगर दक्षिणेतून उमेदवारी मिळाली आहे. भाजपचे विद्यमान खासदार दिलीप गांधी यांना डावलून ही उमेदवारी मिळाली आहे. खासदार गांधी यांचे समर्थक पक्षाच्या या निर्णयावर नाराज आहे.

खासदार गांधी यांनी समर्थकांचा मेळावा घेऊन शक्तिप्रदर्शन केले. त्यात मनमोकळे करत आपण पक्षाची एकनिष्ठ राहणार असून, पक्ष देईल त्या उमेदवाराचा प्रचार करणार असल्याची भूमिका गांधीा यांनी मांडली होती. खासदार गांधी यांच्या या भूमिकेवर त्यांचे पुत्र सुवेंद्र गांधी हे प्रचंड नाराज आहे. त्यांनी बंडखोरीचे निशाण याच मेळाव्यात फडकविले आहे. आपण कोणत्याही परिस्थितीत निवडणूक लढविणार असे जाहीर करून दक्षिण मतदार संघात मतदारांच्या गाठीभेटी सुरू केल्या आहेत.

डॉ. सुजय विखे पाटील हे भाजप तिकिटावर उमेदवारी करत असल्याने विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांची कॉंग्रेसमध्ये चांगलीच कोंडी झाली आहे. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी नगर दक्षिण मतदार संघाची जागा प्रतिष्ठेची केली आहे. पवार यांनी जुन्या निवडणुकींचा संदर्भ देत टिका केली आहे. त्यातून दुखविलेले राधाकृष्ण विखे पाटील यांनी नगर दक्षिण मतदार संघात आघाडीच्या उमेदवाराच्या प्रचार करणार नाही, असे जाहीर केले होते.

दरम्यान, कॉंग्रेसने स्टार प्रचारकांची यादी जाहीर केली. त्यात राधाकृष्ण विखे पाटील यांचे नाव आहे. असे असतानाच राधाकृष्ण विखे पाटील यांनी खासदार दिलीप गांधी यांची घरी जाऊन भेट घेतली आहे. त्यातच या भेटीत दोघांनी बंद खोलीत पाऊणतास चर्चा केली आहे. ही चर्चेचा सार काय आहे जाणून घेण्यासाठी अनेकजण प्रयत्न करत आहेत. परंतु विखे पाटील आणि गांधी या दोघांनी त्यावर चुप्पी साधली आहे. विखे पाटील यांनी ही चर्चा राजकीय नसल्याचे सांगून टाकले. परंतु गांधी यांनी या चर्चेचा सूर राजकीय होता असे सांगितले आहे. या चर्चेत भाजपच केंद्रस्थानी होता, असेही समोर येत आहेत. या बंदखोलीतील चर्चेनंतर विखे पाटील यांनी बाहेर जमलेल्या गांधी समर्थकांशी संवाद साधला.


निवडणुकीसाठी ही भेट नसून, औपचारीक आणि स्नेहातून खासदार दिलीप गांधी यांची भेट घेतली आहे. या भेटीत कोणतीही राजकीय चर्चा झाली नाही. हे माझेच घर आहे. या घरी यायला मला आनंद वाटतो.
राधाकृष्ण विखे पाटील,विरोधी पक्षनेते


विखे पाटील आमच्या कुटुंबातील आहेत. या भेटीत सकारात्मक अशीच चर्चा झाली. संघ, जनसंघ व भाजपचा कार्यकर्ता असल्याने नरेंद्र मोदी यांना पुन्हा एकदा पंतप्रधान करण्यासाठी प्रत्येक जागा निवडून आणणार आहोत.
-खासदार दिलीप गांधी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)