अमेरिका आणि तालिबानमधील चर्चा कोणत्याही निर्णयाविना समाप्त

दोहा (कतार) – दोहा येथे चालू असलेली अमेरिका आणि तालिबानमधील चर्चा कोणत्याही निर्णयाविना समाप्त झाली आहे. या चर्चेत प्रगती झाल्याचे दोन्ही बाजूंनी म्हटले आहे. अफगाणिस्तानमधून परकीय सेना काढून घेण्याबाबत कोणत्याही प्रकारचा समझोता झालेला नाही, पण महिनाअखेरीस चर्चा पुन्हा सुरू होण्याची शक्‍यता आहे.

गेले 16 दिवस चालू असलेल्या या चर्चेत अमेरिकन दलाचे नेतृत्व विशेष दूत खलीलजाद यांनी केले, तर तालिबान दलाचे नेतृत्व त्यांचे राजनैतिक प्रमुख मुल्ला अब्दुल घनी बारादार यांनी केले. खलीलजाद हे अफगाणिस्तानात जन्मलेले अमेरिकन राजनीतिज्ञ आहेत. कोणत्याही दहशतवादी गटाला तालिबान अफगाणिस्तानच्या भूमीचा वापर करू देणार नाही, असे आश्‍वासन अमेरिकेने तालिबानकडून मागितलेले आहे.

-Ads-

दोन्ही पक्षांना युद्धसमाप्ती हवी आहे. शांतीसाठी परिस्थिती सुधारत आहे, चर्चा योग्य मार्गावर आहे असे खलीलजाद यांनी म्हटले आहे. परकीय लष्कराची माघार आणि दहशतवादाविरुद्ध प्रभावी उपायांना अंतिम स्वरूप दिल्यानंतरच तालिबान, अफगाण सरकार आणि अन्य अफगाणी घटकांबरोबर चर्चा सुरू करण्यात येईल असे खलीलजाद यांनी म्हटले आहे. 17 वर्षांनंतर अमेरिकन लष्कर अफगाणिस्तानातून टप्प्याटप्प्याने माघार घेण्याच्या तयारीत आहे. पाकिस्तान आपल्या भूमीवर दहशतवाद पोसत असल्याचा आरोप अफगाणिस्तान आणि अमेरिकेने अनेक वेळा केला आहे.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)