राहुल आणि पवारांमधील चर्चाही अनिर्णित; आठ जागांचा पेच कायम

मुंबई : आगामी लोकसभा निवडणुकीतील जागावाटपासंदर्भात कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यात बुधवारी झालेली चर्चा अनिर्णितच राहिली. लोकसभेच्या आठ जागांबाबतचा पेच त्या बैठकीमुळेही सुटू शकला नाही.

आगामी लोकसभा निवडणूक एकत्रितपणे लढवण्यास सज्ज झालेल्या कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीत महाराष्ट्रातील 48 पैकी 40 जागांच्या वाटपावर सहमती झाली आहे. मात्र, पुणे, नगर, यवतमाळ, वाशिम, बुलढाणा, नंदुरबार, रावेर आणि रत्नागिरी-सिंधुदुर्ग या जागांचा पेच सुटू शकलेला नाही. राहुल आणि पवार यांच्या बैठकीत त्याबाबत तोडगा निघेल, अशी शक्‍यता व्यक्त केली जात होती. मात्र, त्या जागांबाबत निर्णय होऊ शकला नाही, अशी माहिती राष्ट्रवादीच्या सुत्रांनी दिली.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

कॉंग्रेस 25 आणि राष्ट्रवादी 23 जागा लढवणार असल्याचे याआधी कॉंग्रेसच्या सुत्रांकडून सांगण्यात आले होते. मात्र, राष्ट्रवादीच्या सुत्रांनी अद्याप कुठलाच निर्णय झाला नसल्याचे स्पष्ट केले. आता मल्लिकार्जुन खर्गे आणि प्रफुल्ल पटेल या दोन्ही पक्षांच्या ज्येष्ठ नेत्यांमध्ये चर्चेची पुढील फेरी होईल. त्या बैठकीतील प्रस्ताव मंजुरीसाठी राहुल आणि पवार यांच्याकडे पाठवला जाईल, असे त्या सुत्रांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)