अंगठीमुळे आचार संहितेचा भंग झाल्याची चर्चा

कराडच्या मुख्याधिकाऱ्यांना उमेदवाराच्या समर्थकांची भेट

सातारा –
एखाद्या लोक प्रतिनिधी व वरिष्ठ अधिकरी यांच्या कार्याचे कौतुक म्हणून अनेकदा शाल, श्रीफळ, मानपत्र, स्मूर्ती चिन्ह देण्यात येते. सध्या युतीचे सरकार असल्यामुळे पुणेरी पगडी ही दिली जाते. परंतू राज्यात लोकसभा निवडणूकची आचार संहिता लागू झाल्यानंतर साताऱ्यातील एका उमेदवारांच्या समर्थकांनी कराडचे मुख्याधिकारी डांगे यांना सोन्याची अंगठी देऊन सत्कार केला. ही अंगठी आता आचार संहिता भंग केल्याचा पुरावा म्हणून सादर केल्या जाण्याची चर्चा सातारा जिल्ह्यात सुरू झाली आहे.

सातारा जिल्ह्यात सध्या ग्रामपंचायत निवडणूका व लोकसभेच्या निवडणूकीच्या अनुषंगाने रणधुमाळी सुरू झालेली आहे. आपल्या विरोधात तगडा उमेदवार नसावा यासाठी काहींनी आपले राजकीय “कवाड’ खुले करण्याचे प्रयत्न सुरू केलेले आहेत. अद्याप काही राजकीय पक्षाचे उमेदवार जाहीर झालेले नाहीत, तरीही काही हौशी कार्यकत्यांमुळे आचार संहिता उल्लंघनाचे आठ तक्रार दाखल झालेले आहेत. विना परवानगी बॅनर लावणे, शासकीय योजनेची माहिती देणे, दारू-मटण वाटप करणे अशा प्रकारच्या तक्रारी आलेल्या आहेत. त्याची काटेकोरपणाने चौकशी सुरूझालेली आहे.

राजकीय दृष्ट्‌या संवेदनशील असलेल्या कराड नगरपरिषदेचे नगर सेवक राजेंद्र यादव हे राष्ट र्वादीचे कॉंग्रेस पक्षाने जाहीर केलेले अधिकअत उमेदवार खासदार श्री.छ. उदयनराजे भोसले यांचे कट्टर समर्थक आहेत. त्यांनी अनेकदा खासदार श्री. छ. भोसले यांच्या उपस्थितीत कराड नगरीत कार्यक्रम घेतले आहेत. त्याचे सवारनी भरभरून स्वागत केले. परंतू सातारा जिल्हत्यात आचार संहिता सुरू असताना स्वच्छ सर्वेक्षणात कराड नगर परिषदेला यश मिळाल्याबद्दल मख्याधिकारी यशवंत डांगे यांना जाहिररित्या सोन्याची अंगठी भेट देऊन यादव यानी आचार संहिता भंग केली असून याबाबत आता चर्चा सुरू झालेली आहे.

सातारचे जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी श्‍वेता सिंघल यांनी आचार संहितेची अमंलबजावणी काटेकोरपणाने करून निर्भय वातावरणात निवडणूक पार पाडल्या जातील. तसेच भरारी पथकाच्या माध्यमातून उमेदवार किंवा त्यांच्या समर्थकांनी मतदारांना अमिषा दाखवल्यास गुन्हा दाखल करण्यात येईल असा इशारा दिला होता. आता ही भेट दिलेली अंगठी ही कर्तव्य पार पाडल्याबद्दल गौरवाची की आचार संहिता भंगाची? अशी चर्चा रंगू लागली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)