सातारा जिल्हयात शिस्तबध्द रित्या ठिय्या आंदोलन

पश्‍चिम महाराष्ट्र व मराठवाड्यात महाराष्ट्र बंदला पुन्हा हिंसक वळण लागलेले असताना सातारा जिल्हयात मराठा मोर्चाच्या आंदोलकांनी ठिकठिकाणी शिस्तबध्द रित्या ठिय्या आंदोलन केले . जावलीत बैलगाडी मोर्चा साताऱ्यात भजन कीर्तन फलटणमध्ये मुंडण आंदोलन तर तासवडे टोलनाक्‍यावर रास्ता रोको करत आंदोलकांनी बंदची ताकत दाखवून दिली . पोलिसांनी जिल्ह्यात चोख बंदोबस्त ठेवल्याने कोठेही अनुचित प्रकार घडला नाही . जिल्ह्यात झालेल्या कडकडीत बंदचा फटका दळणवळण व तातडीच्या सेवा बंद राहिल्याने सर्वसामान्यांना बसला . मात्र आंदोलकाच्या आडून वित्तहानी करणाऱ्यांवर पोलिसांची करडी नजर राहिल्याने ठिय्या आंदोलन शांततेत पार पाडले.
मे महिन्याच्या ठिय्या आंदोलनाच्या निमित्ताने जिल्हा प्रशासन व पोलीस यांनी बारकाईने होमवर्क करत बंदोबस्त व समायोजनाचे नियोजन केले होते . जिल्हयाच्या प्रत्येक उपविभागाचे उपअधीक्षक व प्रांत यांच्याशी जिल्हाधिकारी श्वेता सिंघल व पोलीस अधीक्षक देशमुख यांनी संपर्क करून सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या होत्या . सातारा जिल्हयाचा कडकडीत बंद निषेधाच्या वेगवेगळ्या प्रकारांनी गाजला . खटाव तालुक्‍यात मायणी ते वडूज हे सत्तावीस किलोमीटरचे अंतर चालत जाऊन तहसीलदारांना निवेदन देण्यात आले . त्यानंतर वेगवेगळ्या खेळांचे डाव रंगले . साताऱ्यात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलकांनी भजन, कीर्तन करत आरक्षणासाठी शासनाचे लक्ष वेधले . तसेच फोडजाई मंदिराच्या प्रांगणात चक्क देवीचा गोंधळ घालण्यात आला.
नगराध्यक्षा माधवी कदम यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी श्वेता सिंघल यांना निवेदन देण्यात आले . कराडमध्ये कोल्हापूर नाक्‍यावर तब्बल दीड तास रास्ता रोको करण्यात आला . महामार्ग रोखण्यात आल्याने बराच काळ वाहतूक मंदावली होती . खबरदारीच्या दृष्टीकोनातून या रास्ता रोको चे ड्रोनद्वारे चित्रीकरण करण्यात आले . कराड तालुक्‍यातील काशीळ हद्दीतील तास व डे टोल नाक्‍यावर आंदोलकांनी ठिय्या दिल्याने महामार्ग वाहतूक विस्कळीत झाली . कराड – विटा राज्यमार्गही दीड तास रोखून धरण्यात आल्याने तीन तास टॅफिक जॅमचा प्रचंड गोंधळ झाला . जावली तालुक्‍याचे मुख्य केंद्र असणाऱ्या मेढा येथे तहसील कार्यालयावर चक्क बैलगाडी मोर्चा काढण्यात येउन शासनाचा निषेध करण्यात आला .फलटणमध्ये कडकडीत बंद पाळण्यात आल्याने जनजीवन ठप्प झाले होते . येथील तहसीलदार कार्यालयासमोर आंदोलकांनी ठिय्या देत प्रशासनाला निवेदन सादर केले . खंडाळा व वाई तालुक्‍यात मोर्चात राजकीय प्रतिनिधी सहभागी झाले . आमदार मंकरंद पाटील यांनी वाईत तर पुरूषोत्तम जाधव यांनी खंडाळ्यात मोर्चात सहभाग नोंदवला पण कटाक्षाने भाषणबाजी टाळली .

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)