व्याजवाडीच्या सरपंचावरील अविश्वास फेटाळला

वाई – वाई तालुक्‍यातील व्याजवाडीच्या सरपंचांवर विरोधकांनी अविश्‍वास ठराव आणला, मात्र, अपेक्षित बहुमताचा आकडा गाठता आल्याने तो फेटाळला गेला. याबाबत माहिती अशी, राजकीयदृष्ट्‌या महत्वाच्या असणाऱ्या व्याजवाडी ग्रामपंचायतीत सहा बिनविरोध झाल्या होत्या तर तीन सदस्यांसाठी निवडणूक घेण्यात आली होती. निवडणुकीनंतर अनेक कारणांनी ग्रामपंचायत तालुक्‍यात चर्चेत राहिली. घरपट्टी थकीत असल्याचे कारण पुढे करत सरपंच व उपसरपंचाचे सदस्यत्व अपात्र ठरविण्याचा घाट विरोधकांनी काही महिन्यांपूर्वी घातला होता. त्यात यश आले नाही.

यानंतर सरपंच सौ. रेश्‍मा शरद पिसाळ यांच्या विरोधात अविश्वास ठराव आणण्यासाठी तीन सदस्यांनी तहसीलदार यांच्याकडे तक्रार अर्ज दाखल केला. त्यानुसार तहसीलदारांनी त्यांच्या अध्यक्षतेखाली बैठक बोलावली होती. परंतु, अविश्वास ठराव पारित करण्यासाठी आवश्‍यक तो बहुमताचा आकडा गाठता न आल्याने विरोधकांनी आणलेला अविश्वास ठराव तहसीलदार रणजीत भोसले यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आलेल्या बैठकीत फेटाळून लावण्यात आला.

यामध्ये विठ्ठल पिसाळ, आप्पासो पिसाळ, चेअरमन- दत्तात्रय कुदळे, रामदास पिसाळ, माजी सरपंच- काशिनाथ पिसाळ, ज्ञानेश्वर पिसाळ, दिलीप पिसाळ, अशोक पिसाळ, चंद्रकांत गुरव, दौलतराव पिसाळ, नितीन पिसाळ, सुभाष पिसाळ, निसार मोमीन, मुल्ला मोमीन, संदीप ढवळे, सनिकांत मिसाळ, संजय मिसाळ, रफिक मोमीन, तेजस कुदळे, सुरेश कुदळे, महेश खांडे, सदस्य- नादिरा मोमीन, प्रियांका मिसाळ यांचे सहकार्य लाभले. दरम्यान, विरोधकांनी कितीही कारभारात अडथळे आणण्याचा प्रयत्न केला तरी विकासकामात कसलाही खंड पडणार नाही, अशी प्रतिक्रिया विश्वासदर्शक ठराव जिंकलेल्या सरपंच सौ. रेश्‍मा पिसाळ यांनी दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)