‘द अॅक्सिडेंटल प्राईम मिनिस्टर’च्या निर्मात्याला अटक

‘द अॅक्सिडेंटल प्राईम मिनिस्टर’चे निर्माते विजय रत्नाकर गुट्टे यांना मुंबईमध्ये अटक करण्यात आली आहे. ३४ कोटींच्या फसवणुकीचा आरोप त्यांचावर असून जीएसटी इंटेलिजन्सच्या पथकाने त्यांना अटक केली आहे. यासंबंधीचे वृत्त एका इंग्रजी वृत्तपत्राने छापले आहे. विजय गुट्टे यांची कंपनी वीआरजी डिजिटल कॉर्प प्रा. लि.वर फेक इनव्हॉईसच्या माध्यमातून ३४ कोटींच्या फसवणुकीचा आरोप आहे. अॅनिमेशन आणि आणि मॅनपॉवरसाठी दुसऱ्या कंपनीकडून ३४ कोटींचे फेक इनव्हॉईस घेतले आहेत. दरम्यान, दुसऱ्या कंपनीवर (हॉरिजॉन आउटसोर्स सोल्युशन प्रा.लि.) आधीपासून १७० कोटींच्या फसवणुकीचा आरोप आहे. विजय गुट्टे यांना १४ ऑगस्टपर्यंत आर्थर रोडवरील जेलमध्ये पाठविण्यात आले आहे.

दरम्यान, ‘द अॅक्सिडेंटल प्राईम मिनिस्टर’ चित्रपट माजी पंतप्रधान मनमोहन सिंह यांचे माध्यम सल्लागार संजय बारू यांच्या पुस्तकावर आधारित आहे. २१ सप्टेंबरला रिलीज होणाऱ्या या चित्रपटात अनुपम खेर मनमोहन सिंह यांच्या भूमिकेत दिसणार आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)