पोलीस महासंचालकपदी सुबोध जयस्वाल तर संजय बर्वे मुंबई पोलीस आयुक्तपदी

मुंबई – मुंबई पोलीस आयुक्त सुबोधकुमार जयस्वाल यांना राज्याच्या महासंचालकपदी बढती देण्यात आली आहे. तर राज्याच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे महासंचालक संजय बर्वे यांची मुंबईच्या पोलीस आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

राज्याचे विद्यमान पोलीस महासंचालक दत्ता पडसलगीकर या महिनाअखेरीस सेवानिवृत्त होत आहे. त्यांच्या जागी जयस्वाल यांना बढती मिळणार मिळली असून त्यांच्या जागी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे महासंचालक बर्वे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. संजय बर्बे हे १९८९ च्या बॅचचे, तर सुबोधकुमार जयस्वाल हे १९८५ च्या बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत. सीमेवर तणावाचे वातावरण असताना महत्वाची पदे रिक्त ठेवणे सुरक्षेच्या दृष्टीने घातक असल्यामुळे आज तात्काळ ही पदे भरण्यात आली आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)