दीपोत्सव : पणत्या पण केवळ दिवाळीच्या नव्हेत (भाग 3)

-निकेश आमने

दिवाळी आली, घरोघरी, दारोदारी दिवे लागतात. खरं तर दिवाळीला महत्त्व असते पणत्यांचे. तेलाच्या दिव्यांचे. त्यांचा मंद सोज्वळ प्रकाश अंध:कार नष्ट करतो. बाहेरचा आणि अंत:करणातलाही. पण आजकाल झगमगाट करणाऱ्या दिव्यांचे प्रस्थ माजलेले आहे. जे दिव्यांचे, तेच माणसांचेही. काही तरी करणाऱ्या माणसांपेक्षा केलेल्या एवढ्याशाही गोष्टीचा डांगोरा पिटण्याचे प्रमाण प्रचंड वाढले आहे, पण आजही मंद तेवणाऱ्या पणत्यांप्रमाणेच शांतपणे कार्य करत राहणारी माणसे आहेत.

तिसरी वैष्णवी देवीदास कायलकर नागपूर शहरातून येऊन ग्रामविकासात काम करत आहे. वैष्णवीने नागपुरात विज्ञान शाखेत पदवी घेतली, निरी सारख्या संस्थेत ती नोकरी करत होती, क्राइम ब्रांच फोरेन्सिकमध्ये देखील तिने काम केलं, मात्र समाजासाठी वेगळं काहीतरी करायचं या इच्छेने ती या परिवर्तनाच्या चळवळीत आली.

आयुष्यात गावाशी कधीही संबध आलेला नसल्याने गावात राहून काम करताना अडचणींचा डोंगर उभा होता. आपल्याला ज्या सुविधा शहरात मिळायच्या त्यातील इथे काहीच नाहीत हे तिने पाहिले. या लोकांचं जगणं जवळून बघितल्यानंतर त्यांच्यात मिसळून त्यांच्यासाठी काम करायचं असा तिने निश्‍चय केला आणि कामाला सुरुवात केली. गावात दारूचं प्रमाण जास्त होतं आणि महिलांची मुख्य मागणी दारूबंदीची होती, पण सुरुवातीलाच दारूबंदीचा प्रश्‍न हातात घेतला तर वाद निर्माण होऊन इतर कामे करता येणार नाहीत, असा वैष्णवीने विचार केला. याचा परिणाम उलट होऊन महिलांनी असहकार पुकारला.

मात्र, शासनाची कर्जमाफी योजना हाती घेतली. त्यासाठी बाहेर जावे लागायचे. ती सुविधा गावातच उपलब्ध करून दिली. स्वतः रात्री दोन दोन वाजेपर्यंत बसून शेतकऱ्यांची अर्ज प्रक्रिया पूर्ण केली. शासकीय कर्मचाऱ्यांच्या कामाच्या पार्श्‍वभूमीवर, मुलगी असून वैष्णवी आपल्यासाठी रात्रीच्या वेळीही काम करते हा अनुभव त्यांच्यासाठी नवीन होता. यातून पुरुष, युवक व महिला तिन्ही घटक जोडले गेले. यानंतर सूर्यगंगा नदीवरील सिंचनाचा महत्त्वाचा असलेला प्रश्‍न सातत्याने पाठपुरावा करून सोडविल्यामुळे सूर्यगंगा अशीच तिची गावात ओळख निर्माण झाली. त्यानंतर तिने आरोग्याचे अनेक प्रश्‍न हाती घेतले.

आरोग्य खाते याबाबतीत उदासीन होते आणि लोकही त्याकडे दुर्लक्ष करायचे. वैष्णवीने लोकांचं प्रबोधन करून हे काम हाती घेतलं. अंगणवाडी बोलकी करून लहान बालकांचे लक्ष वेधून घेणाऱ्या बहिणी तयार केल्या. त्यामुळे अंगणवाडी सेविकांचा देखील शिकवण्यातील उत्साह वाढला. याचा परिणाम नर्सरी शाळेत जाणाऱ्या मुलांचे प्रमाण कमी होऊन अंगणवाडीत संख्या वाढली. हे सर्व करताना लोकांचा विश्‍वास आपोआप संपादन झाला. आता या गावाला स्मार्ट ग्राम तयार करण्याचातिचा ध्यास आहे.

मयूरी, शिल्पा, वैष्णवी या प्रत्येक तरुणीचा प्रवास स्पर्धेच्या युगात फक्त आपलेच ध्येय जपणाऱ्या स्मार्ट तरुणाईला प्रेरणादायी असाच आहे.

ज्योतसे ज्योत जगाते चलो…. म्हणतात त्याप्रमाणे या तिघींच्या पावलावर पाऊल टाकत दीपमालिकाच तयार झाली पाहिजे. तीच खरी आपली दिवाळी.

दीपोत्सव : पणत्या पण केवळ दिवाळीच्या नव्हेत (भाग 1)

दीपोत्सव : पणत्या पण केवळ दिवाळीच्या नव्हेत (भाग 2)


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)