दीपोत्सव : पणत्या पण केवळ दिवाळीच्या नव्हेत (भाग 2)

-निकेश आमने

दिवाळी आली, घरोघरी, दारोदारी दिवे लागतात. खरं तर दिवाळीला महत्त्व असते पणत्यांचे. तेलाच्या दिव्यांचे. त्यांचा मंद सोज्वळ प्रकाश अंध:कार नष्ट करतो. बाहेरचा आणि अंत:करणातलाही. पण आजकाल झगमगाट करणाऱ्या दिव्यांचे प्रस्थ माजलेले आहे. जे दिव्यांचे, तेच माणसांचेही. काही तरी करणाऱ्या माणसांपेक्षा केलेल्या एवढ्याशाही गोष्टीचा डांगोरा पिटण्याचे प्रमाण प्रचंड वाढले आहे, पण आजही मंद तेवणाऱ्या पणत्यांप्रमाणेच शांतपणे कार्य करत राहणारी माणसे आहेत.

दुसरी आहे शिल्पा शिरवडकर. डी. एडचं शिक्षण डोंबिवलीत घेतल्यानंतर अध्यापनाचं काम करत होती, पण काही तरी वेगळे करायचे अशा ध्यासातून, कमवा आणि शिका या योजनेच्या माध्यमातून तिने सोशल वर्कचा अभ्यासक्रम पूर्ण केला. आणि आता महाराष्ट्र ग्राम सामाजिक परिवर्तन अभियानाच्या माध्यमातून रायगड जिल्ह्यातील राबगाव येथे काम करत आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

गाव राजकारण वा अज्ञान यामुळे विकासापासून कोसो दूर आहे. शिल्पाला सुरुवातीला गावात काम करताना प्रतिसाद मिळत नव्हता. मात्र, तिने प्राथमिक शाळेपासून सुरुवात केली. मुलांसोबत मैत्री झाल्यानंतर त्यांच्या आया जोडल्या गेल्या. त्या माध्यमातून बचत गटाचे काम वाढले. रायगड जिल्ह्यातील कातकरी समाजाच्या वाड्यांवर अनेक प्रश्‍न होते, त्यांना विश्‍वासात घेऊन व शासनाकडे पाठपुरावा करून ते प्रश्‍न सोडवत, कामे पूर्ण करण्यात यश मिळत आहे.

राजस्व अभियानाच्या माध्यमातून आदिवासींचे जातीचे दाखले, ते रेशन कार्ड अशा अनेक महत्त्वाच्या कागदपत्रांची पूर्तता होत आहे. रोजगार निर्मितीसाठी वनराज व गिरीराज या कोंबडीच्या तीनशे गटांचे वाटप केले आहेत. शिक्षणाचा व पोषणाचा दर्जा सुधारण्यासाठी, कुपोषण मुक्तीकरिता पोषण परसबागांची निर्मिती, नियमित आरोग्य तपासणी घेऊन आरोग्याचे प्रश्‍न हाताळताना अनेक आव्हानांना सामोरे जावे लागत आहे.

चार वाडीवस्त्यांचे काम नियमित पाहताना आठ किलोमीटरचा प्रवास जंगलातून एकटीने, बऱ्याचदा पायी करावा लागतो. गावात दिवसभर कामामुळे लोक मिळत नाहीत. याही परिस्थितीत अनेक विकास कामे मार्गी लावत गाव आदर्श करण्यासाठी ती पुरेपूर प्रयत्न करत आहे. हीच तिची जिद्द वाखाणण्यासारखी आहे.

दीपोत्सव : पणत्या पण केवळ दिवाळीच्या नव्हेत (भाग 1)

दीपोत्सव : पणत्या पण केवळ दिवाळीच्या नव्हेत (भाग 3)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)