बिग बॉस-12 ची ‘दीपिका कक्कर’ ठरली विजेती

बिग बॉस 12 पर्वाची विजेती ‘ससुराल सिमर का’ या मालिकेतली ‘सिमर’ म्हणजेच ‘दीपिका कक्कर इब्राहिम’ ही विजेती ठरली आहे. तर भारतीय क्रिकेट संघाचा माजी क्रिकेटपटू ‘श्रीसंत’ उपविजेता ठरला आहे. बिग बॉसचा सूत्रसंचालक सलमान खानने दीपिकाच्या विजयाची औपचारिक घोषणा केली.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

दीपिकाचे नाव घोषित करण्याआधी सलमानने थोड्यावेळा दीपिकाची थोडी मस्करी केली. पण त्यानंतर काही क्षणातचं ती विजेती असल्याचे त्याने सांगितले. त्यानंतर सलमनाने उपविजेता श्रीसंत आणि विजेती दिपिकाचे अभिनंदन केले.

सोशल मीडियावर बिगबॉस 12 चा विजेता कोण होणार या गोष्टीची चांगलीच चर्चा रंगली होती. बिग बॉस 12 पर्वाची फायनल सुरू झाल्यापासूनच दीपिकाचं नाव सोशल मीडियावर ट्रेन्डं होत होतं. बिग बॉस पर्व 12च्या फायनलमध्ये श्रीसंत आणि दीपिकासह करणवीर बोहरा, दीपक ठाकूर हे स्पर्धक स्पर्धेत होते पण यामध्ये अखेर दीपिकाने बाजी मारली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)