दीपा कर्माकर लागली ऑलिम्पिकच्या तयारीला

नवी दिल्ली  – भारताची अव्वल जिम्नॅस्ट दीपा कर्माकर ही टोकियो येथे होणाऱ्या 2020 ऑलिम्पिक मध्ये जागा मिळवण्याच्या दृष्टीने जर्मनीच्या कॉट्टबसमध्ये सुरू होत असलेल्या आर्टिस्टिक जिम्नॅस्टिक विश्‍वचषकात सहभागी होणार असून चार दिवस रंगणाऱ्या या विश्‍वचषकात आठ स्पर्धा होणार आहे. यामध्ये आघाडीची कामगिरी करणाऱ्या तीन खेळाडूंना ऑलिम्पिकमध्ये थेट प्रवेश दिला जाणार आहे. त्यामुळे ऑलिम्पिक प्रवेशाच्या दृष्टीने दिपा सध्या तयारीला लागली असून.

तिच्या सोबत भारतीय संघात बी. अरुणा रेड्डी, आशीष कुमार आणि राकेश पात्रा देखील असणार आहेत. रिओ ऑलिम्पिकमध्ये दीपा कर्माकरचे पदक थोड्या फरकाने हुकले होते. मात्र आता होणाऱ्या स्पर्धेत दीपाकडून भारताला पदकाची आशा आहे. या वर्षी जुलैमध्ये झालेल्या विश्‍व चॅंलेंज कपमध्ये तीने सुवर्ण पदक मिळवले होते. अरुणानेही मेलबर्नमध्ये विश्‍व पोल व्हॉल्ट स्पर्धेत कांस्य पदकाची कमाई केली होती.

तर, पुरूषांच्या स्पर्धेमध्ये भारताचे लक्ष आशिषवर असेल. त्याने 2010 अशियाई स्पर्धेत कांस्य पदक मिळवले. तसेच 2010 राष्ट्रकुल स्पर्धेतही एक कांस्य व रौप्य मिळवले. तसेच, साई आणि मान्यता नसलेल्या भारतीय जिम्नॅस्टिक महासंघाच्या वादामुळे स्पर्धेच्या तयारीवर परिणामही झाला आहे. या वादामुळे साईने योगेश्वर सिंह व प्रणती दास यांचा खर्च करण्यास नकार दिला व चार जिम्नॅस्टला स्पर्धेत सहभागी होण्यास मंजूरी दिली.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)