बॉलीवूड अभिनेत्री दिशा पाटणी पुन्हा एकदा डिनर डेटमुळे चर्चेत आली आहे. पण यावेळी टायगर श्रॉफ नव्हे, तर तिच्यासोबत आदित्य ठाकरे होता. हो हे खरे आहे, काही दिवसांपूर्वी दिशा ही आदित्यसोबत डिनर गेल्याने अनेकांनी तिला ट्रोल केले आहे.
या डिनर डेटवर दिशा ही रेड टॉप आणि डेनिमचा शॉर्ट स्कर्टमध्ये खूपच हॉट दिसत होती. तर आदित्य ठाकरे हा यलो टीशर्टमध्ये कॅज्युअल आणि कूल दिसत होता. या डिनर डेटवरील दिशा आणि आदित्यचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होताच त्यांना ट्रोल करण्यास सुरुवात झाली.
दरम्यान, सतत आपल्या बॉयफ्रेंड टायगरसोबत दिसणारी दिशा अचानक आदित्यसोबत झळकल्याने तिच्या चाहत्यांचा राग अनावर झाला. अनेकांनी दिशाला ट्रोल करत “एक था टायगर’ आणि “टायगर जिंदा है’ असा कॉमेंट केल्या. पण यापूर्वीही अनेक वेळा दिशा आणि आदित्य या दोघांना एकत्रित स्पॉट करण्यात आलेले आहे. तसेच हे दोघे बांद्रा येथे लंच करताना एकत्रित दिसले होते.