दिलीप कुमारांना दवाखान्यातून सुट्टी

मुंबई: हिंदी चित्रपट सृष्टीमधील जेष्ठ अभिनेते दिलीप कुमार यांना आज लीलावती रुग्णालयातून घरी सोडण्यात आले. गेल्या काही दिवसांपासून कुमार न्यूमोनियाने त्रस्त असल्याने त्यांना मुंबई येथील लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. दिलीप कुमार यांना रुग्णालयात दाखल केल्यापासूनच त्यांच्या प्रकृतीबाबत उलट सुलट चर्चा सुरु होत्या मात्र आज त्यांना लिलावतीतून डिस्चार्ज मिळाल्याने दिलीप कुमार यांची प्रकृती स्थिर असल्याचे स्पष्ट झाले आहे.

दिलीप कुमार यांचे जवळचे समजले जाणारे फैसल फारुकी यांनी कुमार यांच्या अधिकृत ट्विटर अकाउंट द्वारे त्यांच्या ‘डिस्चार्ज’ बाबत माहिती दिली आहे ते लिहतात, “देवाच्या कृपेने दिलीप साहेबांची प्रकृती आता ठीक असून त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. डॉक्टरांनी त्यांना सक्तीचा आराम घेण्याचा सल्ला दिला आहे.”

-Ads-

दरम्यान दिलीप कुमार यांच्या प्रकृतीमध्ये सुधारणा होत असल्याचे वृत्त आल्याने त्यांच्या चाहत्यावर्गामध्ये आनंदाचे वातावरण आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)