सफाई कर्मचाऱ्यांना शासकीय सुविधा पुरवा

दिलीप के. हाथीबेड : योजनांची अंमलबजावणी व्हावी

पुणे – सफाई कर्मचाऱ्यांच्या कामाचे महत्त्व लक्षात घेऊन त्यांच्याविषयी असलेल्या योजनांची अंमलबजावणी व्हायला हवी, असे आवाहन राष्ट्रीय सफाई कर्मचारी आयोगाचे सदस्य दिलीप के. हाथीबेड यांनी सोमवारी केले.

-Ads-

सफाई कर्मचाऱ्यांच्या समस्या जाणून घेण्यासाठी ते राज्याच्या दौऱ्यावर आले असून, त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी पिंपरी-चिंचवड महापालिकेचे आयुक्‍त श्रावण हर्डीकर, पुणे महापालिकेतील अतिरिक्‍त आयुक्‍त राजेंद्र निंबाळकर तसेच विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

देशामध्ये स्वच्छता अभियान राबविले जात आहे. सफाई कर्मचारी हा समाजातील शेवटचा घटक आहे. त्याच्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारच्या योजना आहेत, या योजनांचा लाभ माणुसकीच्या नात्याने त्यांना मिळाला पाहिजे. पुणे महापालिका, पिंपरी-चिंचवड महापालिका, सर्वोपचार ससून रुग्णालय आदींमध्ये सफाई कर्मचाऱ्यांचे विविध प्रश्‍न आहेत. सफाई कर्मचाऱ्यांना गणवेश, हातमोजे, गमबूट, मास्क तसेच इतर आवश्‍यक सुविधा, साधनसामग्री उपलब्ध करून दिली पाहिजे. सफाई कर्मचाऱ्यांची दर तीन महिन्यांनी नियमित आरोग्य तपासणी झाली पाहिजे, ठेकेदारांमार्फत निवडण्यात आलेल्या सफाई कर्मचाऱ्यांना नियमानुसार वेतन दिले जाते का, त्यांचा भविष्यनिर्वाह निधी नियमित कपात करुन जमा केला जातो का? याबाबतही माहिती घेण्याचे निर्देश हाथीबेड यांनी दिले.

पुणे महापालिका आणि पिंपरी-चिंचवड महापालिकांतील सफाई कर्मचाऱ्यांच्या प्रश्‍नांसदर्भांत स्वतंत्र समन्वय समित्या स्थापन करण्याची सूचना त्यांनी केली. या समित्यांमध्ये संबंधित अधिकारी, सफाई कर्मचारी संघटनांचे प्रतिनिधी, महिला यांचा समावेश असेल. दर तीन महिन्यांनी या समित्यांची बैठक होईल. पोलीस विभागात प्रत्येक पोलीस ठाण्यात स्वतंत्र सफाई कर्मचारी नेमला जावा, यासाठी राज्यसरकारकडे प्रस्ताव पाठवण्याची सूचनाही हाथीबेड यांनी केली.

यानंतर सोलापूर आणि सातारा जिल्ह्यात जाऊन सफाई कर्मचाऱ्यांच्या समस्या जाणून घेणार असल्याचे हाथीबेड यांनी सांगितले. तीन महिन्यानंतर विभागीय आयुक्त स्तरावर आढावा बैठक घेणार असल्याचे हाथीबेड म्हणाले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)