नगरमध्ये दिलीप गांधी यांच्या मुलाची बंडखोरी ; अपक्ष लढवणार निवडणूक

नगर: भारतीय जनता पक्षाचे खासदार दिलीप गांधी यांचे सुपुत्र माजी नगरसेवक सुवेंद्र गांधी यांनी बंडखोरी करत नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातून अपक्ष निवडणूक लढविणार असल्याचे आज जाहीर केले. “आई-वडिल आणि कार्यकर्त्यांच्या आशीर्वादाच्या जोरावर ही निवडणूक लढविणार आहे,’ असे सुवेंद्र गांधी यांनी सांगितले.

नगरमधून दिलीप गांधी यांनी सलग ३ वेळा विजय मिळवला आहे. यंदा भाजपने कॉंग्रेसचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांचे सुपुत्र डॉ. सुजय विखे पाटील यांना उमेदवारी दिल्याने विद्यमान खासदार दिलीप गांधी नाराज होते. आज रविवारी झालेल्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात सुरेंद्र गांधी यांनी निवडणूक लढवणार असल्याचे जाहीर केले.

गांधी म्हणाले, ‘आईवडिलांचे ऐकत नाही, अशांना भाजप श्रेष्ठींनी उमेदवारी दिली आहे. हे काय कार्यकर्त्यांचे ऐकणार. खासदार गांधी यांनी पक्ष, देश, समाजासाठी एकनिष्ठेने काम केले आहे. त्याचीच पावती म्हणून ही कार्यकर्त्यांची गर्दी आहे. भाजपने नेहमीच स्वदेशीचा पुरस्कार केला आहे. विदेशी गांधींसाठी कार्यकर्त्यांचा मेळावा होत आहे आणि त्याच्यासमोरील मंगल कार्यालयात स्वदेशी गांधींसाठी मेळावा होत आहे. हे दोन्ही मेळाव्यातील गर्दीची तुलना केल्यावर खासदार गांधी यांच्या कामाचा लौकिक सांगून जाते.’

 

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)