सर्वाधिक अडचणीच्या जागेवरून दिग्विजय सिंह यांनी निवडणूक लढवावी : कमलनाथ यांची मागणी 

छिंदवाडा : मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ यांनी आज काँग्रेसचे ज्येष्ठनेते दिग्विजय सिंह यांनी जर 2019 लोकसभा निवडणूक लढण्याचा निर्णय घेतला तर त्यांनी राज्यातील सर्वाधिक अडचणीच्या मानल्या जाणाऱ्या जागेवरून निवडणूक लढवावी अशी मागणी केली आहे.

याबाबत पत्रकारांशी संवाद साधताना मुख्यमंत्री कमलनाथ यांनी, “मी दिग्विजय सिंह यांच्याशी आगामी लोकसभा निवडणुकांबाबत चर्चा केली असून, मी त्यांना जर आपण लोकसभा निवडणूक लढवणार असाल तर काँग्रेससाठी सर्वाधिक अडचणीच्या मानल्या जाणाऱ्या मतदारसंघातून निवडणूक लढवावी अशी विनंती देखील केली आहे. राज्यामध्ये लोकसभेचे तीन-चार मतदारसंघ असे आहेत की तेथून गेल्या तीस-पस्तीस वर्षांमध्ये काँग्रेस उमेदवार विजयी होऊ शकले नाहीत.” अशी माहिती दिली.

काँग्रेस पक्षातील सूत्रांनी याबाबत अधिक माहिती देताना सांगितले की मुख्यमंत्री कमलनाथ यांनी दिग्विजय सिंह यांच्याकडे भोपाल अथवा इंदोर येथील लोकसभेच्या जागेसाठी निवडणूक लढवावी अशी मागणी केली आहे. मुख्यमंत्री कमलनाथ हे दिग्विजय सिंह यांनी भोपाळ येथून निवडणूक लढवण्यासाठी आग्रही असून या जागेवरून 1984 मध्ये काँग्रेस उमेदवार शंकर दयाल शर्मा यांनी शेवटची निवडणूक जिंकली होती त्यानंतर मात्र काँग्रेसला या जागेवरून आजतागायत विजय मिळवण्यात यश आलेले नाही.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)