आव्हानात्मक परिस्थितीत चुका भोवल्या – रहाणे 

लंडन: इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यातील पहिल्या डावांत संपूर्ण भारतीय संघ केवळ 107 धावांमध्ये परतल्यानंतर भारताचा उपकर्णधार अजिंक्‍य रहाणे म्हणाला की, मैदानावर पहिल्या दिवशी पडलेल्या पावसाने, तसेच ढगाळ हवामानामुळे वेगवान गोलंदाजांचे चेंडू प्रमाणापेक्षा जास्त स्विंग होत होते. त्यामुळे फलंदाजी करणे आव्हानात्मक होते.
त्यातच आमच्या फलंदाजांनी केलेल्या चुका आम्हाला भोवल्या आणि आमचा डाव स्वस्तातच आटोपला. चेंडू वेगाने येत होता आणि कसाही स्विंग होत होता, कोणता चेंडू सोडायचा आणि कोणता खेळायचा हे आव्हान आमच्यासमोर होते. आम्हाला धावा काढायच्या होत्या आणि खेळपट्टीवर टिकूनही राहायचे होते. या दबावाखाली आमच्या फलंदाजांनी चुका केल्या, असे सांगून रहाणे म्हणाला की, शेवटी आपण आपल्या चुकांमधूनच शिकतो. यातून धडा घेऊन आम्ही जेवढ्या लवकर फलंदाजीत सुधारणा करू तितके चांगले.
अँडरसनने अत्यंत भेदक मारा केला. त्याने अचूक टप्प्यावर गोलंदाजी करताना भारतीय फलंदाजांवर दबाव वाढवताना त्यांना चुका करण्यास भाग पाडले. त्या आव्हानाला सामोरे जाता आले नाही याचे शल्य आम्हाला राहणार आहे. यात सुधारणा केली नाही, तर ही मालिका गमावण्याचा धोका आमच्यासमोर आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)