#विविधा: रवींद्रनाथ-अवनींद्रनाथ

माधव विद्वांस 
गुरुवर्य रवींद्रनाथ टागोर सर्वज्ञात आहेत त्यांचे आज पुण्यस्मरण त्यांचे पुतणे अवनींद्रनाथ टागोर यांचा आज जन्मदिन. रवींद्रनाथांची भारताच्या व बांग्लादेशच्या राष्ट्रगीताचे गीतकार, नोबेल पारितोषिक विजेते, शिक्षण तज्ज्ञ, चित्रकार अशी जगाला ओळख आहे. गुरुवर्य रवींद्रनाथांचा जन्म कलकत्ता येथे पिराली नामक ठाकूर उपनावाच्या कुटुंबात झाला. त्यांचे वडील देवेंद्रनाथ आणि आई शारदादेवी. त्यांच्या एकूण 15 अपत्यांपैकी रवींद्रनाथ चौदावे.टागोरांच्या गीतांजली या काव्यग्रंथास नोबेल पुरस्काराने सन 12 नोव्हेंबर 1913 मध्ये गौरविण्यात आले.
टागोर हे पहिले पाश्‍चिमात्य नसलेले पुरस्कार विजेते होते. रवींद्रनाथांचे काव्यलेखन बालवयातच सुरू झाले होते. त्यांच्या मूळ बंगाली काव्यसंग्रहात 157 कविता होत्या त्यापैकी 103 कवितांचे इंग्रजी भाषांतर लंडनच्या इंडिया सोसायटीने 1912 साली प्रसिद्ध केले. जास्त करून निसर्गाशी तसेच अध्यात्माशी निगडीत अशा या कविता आहेत. वैष्णव संत कवींच्या धर्तीवर भानुसिंह या टोपणनावाने ब्रजबोलीत त्यांनी गीते लिहिली. बंगालमधील बीरभूम जिल्ह्यातील बोलपूरजवळ एक विस्तीर्ण माळ रायपूरच्या जमीनदाराकडून देवेंद्रनाथांनी विकत घेऊन तेथे एक कुटिर बांधले. पुढे त्याचीच दुमजली इमारत केली. तिचे नाव शांतिनिकेतन.
आता माहितीकरून घेऊ त्यांच्या पुतण्याची अवनींद्रनाथ टागोर यांची. अवनींद्रनाथ फारसे परिचित नाहीत पण जलरंगातील वेगळे निर्मितीतंत्र वापरणारे एक श्रेष्ठ आधुनिक भारतीय चित्रकार होते. त्यांचा जन्म कोलकत्यामध्ये 7 ऑगस्ट 1871 रोजी झाला.
सन 1881-91 या काळात कलकत्त्याच्या संस्कृत कॉलेजमध्ये त्यांचे शिक्षण झाले. या सुमारास त्यांनी संस्कृतमध्ये काव्ये व मुलांसाठी कथा लिहिल्या, तसेच कथांवर आधारित चित्रेही काढली.
या उपक्रमांमध्ये त्यांना रवींद्रनाथ टागोरांचे प्रोत्साहन लाभले. रंग-कुंचल्याद्वारा साकारलेली चित्रकाव्ये, असेही त्यांच्या या कलाविष्काराचे वर्णन करता येईल. पोएट्‌स बाऊल डान्स इन फाल्गुनी, द एंड ऑफ द जर्नी, राजा विक्रम, रांची लॅंडस्केप, क्वीन ऑफ द फॉरेस्ट, बॅनिश्‍ड यक्ष, द लास्ट व्हॉयेज, द ड्रीम ऑफ शहाजहान इ. चित्रे तसेच कृष्णलीलेवरील चित्रमाला (1901-03) या त्यांच्या उल्लेखनीय कलाकृती होत. सन 1914 मधील पॅरिस येथील त्यांच्या चित्रप्रदर्शनामुळे युरोपमध्ये त्यांना प्रसिद्धी व प्रशंसा लाभली.
या दोघांनाही विनम्र अभिवादन. 

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)