डिझेल चोरणारी टोळी जेरबंद

नगर – रात्रीचे वेळी महामार्गावरील हॉटेल समोर उभ्या असलेल्या वाहनातील डिझेल चोरणारी टोळी जेरवंद करण्यात आली आहे. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेच्या वतीने करण्यात आली असून 5 लाख 48 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

आरोपी भूरा रज्जाक शहा (वय- 30, रा. धुपवाडा, ता.बडोदीया, जि- साजापूर, मध्यप्रदेश, ह. रा. आगडगांव, ता. नगर), इद्रीस हनिफ खान (मेवाती), वय- 24, रा. सदर,) नौशाद बाबू शहा (वय-30) यांना ताब्यात घेतले आहे. त्याचा साथीदार आरोपी सुहास संभाजी खाडे, रा. आगडगांव, ता. नगर) हा चोरूण आनलेले डिझेलची विक्री करत असून तो फरार झाला आहे.

स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिलीप पवार यांना मिळालेल्या माहिती नुसार ही कारवाई करण्यात आली. यावेळी पथकातील सहायक पोलीस निरीक्षक संदीप पाटील, सोन्याबापू नानेकर, मन्सूर सय्यद, दत्ता गव्हाणे, रविंद्र कर्डिले, अशोक गुंजाळ, संतोष लोढे, सचिन अडबल, दीपक शिंदे, मनोज गोसावी, चालक संभाजी कोतकर, चालक बाळासाहेब भोपळे यांनी कारवाई केली.

यापथकाने आरोपी सुहास खाडे याचे घराचे आडोशाला उभ्या केलेल्या स्विफ्ट व शेवरोलेट कारमधून डिझेल काढण्याचे पाईप, तसेच अंदाजे 35 लिटर क्षमतेचे प्लॅस्टिकचे 6 ते 7 ड्रम, अर्धवट डिझेलने भरलेले, त्यामध्ये अंदाजे 125 लिटर डिझेलसह (नं.एम.पी.43.सी.3331) व शेवरोलेट कार (नं.एम.एच.14.ए.ई.4036) असा एकूण 5 लाख 48 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

याबबत राजू भिमराज पवार (वय.30,रा. कात्रड, ता.राहुरी) त्यांचे मालकीच्या ट्रक (नं. एम.एच.17.टी.7817 व ट्रक नं. एम.एच-17. टी.9088 अशा दोन ट्रकमधून जळगांव येथून मका भरुन त्यांचा सहकारी ड्रायव्हर विलास जगन्नाथ जरीपटके, (रा. जळके, ता नेवासा) याचेसह नगर-मनमाड महामार्गाहुन पुणेकडे जात असताना देहरे टोलनाका येथील हॉटेल समोर ट्रक उभ्या करुन झोपले असताना 44 हजार 200 रुपयांचे डिझेले चोरूण नेले होते. याबात एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)