रणबीर-आलियाचा रोमँटिक डान्स पाहिला का?

अभिनेता रणबीर कपूर आणि चुलबुली गर्ल अभिनेत्री आलिया भट्टच्या रिलेशनशिपच्या चर्चा सध्या चांगल्याच रंगत आहे. आलिया भट्ट आणि रणबीर कपूर नुकतेच एका अवॉर्ड शोदरम्यान एकत्र दिसले आहेत. या अवॉर्ड शोमध्ये आलिया भट्ट आणि रणबीर कपूर यांनी ‘स्टूडेंट ऑफ दी इअर’मधील इश्कवाला लव्ह या गाण्यावर एकत्र डान्स केला. या डान्सला उपस्थितांची चांगलीच दाद मिळाली.

दरम्यान, आलिया भट्ट आणि रणबीर कपूर लवकरच ‘ब्रम्हास्त्र’ या चित्रपटात झळकणार आहेत. त्यांच्या नात्याला कुटुंबीयांनीही ग्रीन सिग्नल दिला आहे. या जोडीच्या विवाहासाठी चाहतेही आसुसलेले आहेत.’ब्रह्मास्त्र’च्या प्रदर्शनानंतर रणबीर-आलिया विवाहबंधनात अडकणार असल्याच्या चर्चाही सुरु झाल्या आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)