तुम्ही टेस्ट केली का ‘दीपिका पादुकोण’ डोसा, थाळी?

दीपिका पादुकोणचे चाहते जगभरात आहेत. तिच्या नावावर अनेक देशात वेगवेगळ्या नावाने फॅन क्लबही चालवले जातात. परंतु, आता दीपिका पादुकोणच्या नावाने डोसा आणि पराठा थाळी विकली जात आहे. सोशल मीडियावर दोन हॉटेलचे मेनूकार्ड मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहेत.

पुण्यातील एका हॉटेलमध्ये दीपिका पादुकोण पराठा थाळीचा आस्वाद पुणेकरांना ६०० रुपयांना चाखायला मिळत आहे. या हॉटेलमधील मेनूकार्डचा फोटो एका युजरने सोशल मीडियावर टाकला. या मेनूकार्डमधील कोणत्याच थाळीचे नाव साधारण नसून यामध्ये सनी देओल पराठा थाळी, युवराज सिंह पराठा थाळी, भगत सिंह पराठा थाळी, अक्षय कुमार पराठा थाळी, सचिन तेंदुलकर पराठा थाळी, यो यो हनी सिंह पराठा थाळी, दारा सिंह पराठा थाळी इंडियाज बिगेस्ट पराठा, बाहुबली पराठा थाळी, माधुरी दीक्षित पराठा थाळी, द कुंभकरण पराठा थाळी, अक्षय कुमार पराठा थाळी असे थाळीचे प्रकार हॉटेलमध्ये बघायला मिळतात.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

तर दुसरीकडे, अमेरिकेच्या टेक्सास प्रांतातील डोसा लॅब नावाच्या हॉटेलमध्ये दीपिका पादुकोणच्या नावाने डोसा विकला जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)