मुंबई- महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांचे लॉस एन्जेलिस आणि कॅलिफोर्नियातील म्युझिकल कॉन्सर्ट आयोजित करण्यात आला होता. या कॉन्सर्टला प्रेक्षकांचा तुफान प्रतिसाद मिळत आहे. या कार्यक्रमाचे फोटो अमृता यांनी इंस्टग्राम अकाउंटवर शेअर केले आहेत. ‘जय हो’ असे या चॅरिटी म्युझिकल शोचे नाव असून ‘अमेरिकन असोसिएशन ऑफ फिजिशिअन्स ऑफ इंडियन ओरिजिन’ यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केलं होतं. हृदयविकार, ल्युकेमिया आणि संदर्भातले आजार असलेल्या भारतातल्या आणि अमेरिकेतल्या रूग्णांच्या मदतीसाठी हा चॅरिटी शो आयोजित करण्यात आला होता.
https://www.instagram.com/p/ByZ3K5LjW52/?utm_source=ig_web_copy_link
https://www.instagram.com/p/ByUfnwjjtkX/?utm_source=ig_web_copy_link