विंग कमांडर अभिनंदन यांच्या स्क्वाड्रनचा नवा पॅच पाहिलात का?

नवी दिल्ली – विंग कमांडर अभिनंदन यांनी पाकिस्तानी हवाई दलातर्फे भारतावर २७ फेब्रुवारी रोजी करण्यात आलेल्या हवाई हल्ल्यावेळी अद्वितीय शौर्य दाखवत पाकिस्तानचे एक एफ १६ लढाऊ विमान पाडले होते. एवढंच नव्हे तर भारतीय सीमांमध्ये घुसखोरीकरून हल्ला करणाऱ्या पाकिस्तानच्या लढाऊ विमानांनाही अभिनंदन यांनी पिटाळून लावले होते. ही कारवाई करत असताना पाकिस्तानच्या हाती लागल्यानंतर पाकिस्तानकडून करण्यात आलेल्या मानसिक छळाचा मोठ्या सामर्थ्याने सामना करत अभिनंदन यांनी भारताबाबतची कोणतीही गुप्त माहिती पाकिस्तानला दिली नाही.

दरम्यान, विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांच्या या जिगरबाज कामगिरीची पोहोचपावती म्हणून अभिनंदन यांचा समावेश असलेल्या भारतीय हवाई दलाच्या स्क्वाड्रन क्रमांक ५१ला एक विशेष पॅच बहाल करण्यात आला आहे. पाकिस्तानद्वारे करण्यात आलेल्या हवाई हल्ल्यावेळी भारताच्या मिग २१ विमानांनी पाकिस्तानद्वारे डागण्यात आलेल्या ४ ते ५ आधुनिक AIM-120 AMRAAM मिसाईल्स चकवण्यात आल्या होत्या या मुळे या पॅचवर AMRAAM DODGERS असा उल्लेख देखील करण्यात आला आहे. तसेच या नव्या पॅचवर भारताचे मिग २१ पाकिस्तानच्या एफ १६ वर निशाणा साधताना दिसत आहे. या पॅचद्वारे स्क्वाड्रन क्रमांक ५१ला ‘फाल्कन स्लेयर्स’ असं देखील संबोधण्यात आलं आहे.

https://twitter.com/ANI/status/1128627114796830720

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)