पंतप्रधान मोदींचे दौरे चायनीज रेसिपीज शिकण्यासाठी होते का – धनंजय मुंडे 

मुंबई – चीनने संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा मंडळांमध्ये पुन्हा एकदा आपल्या नकाराधिकाराचा वापर करत जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेचा म्होरक्या मसूद अझर यास संयुक्त राष्ट्र संघाच्या आंतरराष्ट्रीय दहशतवाद्यांच्या यादीमध्ये समाविष्ट करण्यास खोडा घातला. यावरून देशातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. यानंतर आज विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार हल्ला चढविला आहे.

धनंजय मुंडे यांनी म्हंटले कि, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाच वर्षात इतक्या वेळा चीनचा दौरा केला. चीनचे राष्ट्राध्यक्ष देखील खास गुजरात भेटीला आले होते. तरी चीनने मसूद अजहर प्रकरणात भारताविरुद्ध भूमिका घेतली आहे. मोदींच्या परराष्ट्र धोरणाचे काय झाले? हे दौरे काय ढोकळा आणि चायनीज रेसिपीज शिकण्यासाठी होते का? असा प्रश्न उपस्थित केला.

https://twitter.com/dhananjay_munde/status/1106128554348011521

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)