#MissionShaktiची घोषणा करायला मोदी काय अंतराळात चाललेत का? : ममता बॅनर्जी

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज #MissionShakti बाबतची माहिती देण्यासाठी स्वतः देशाच्या जनतेला संबोधित केल्यावरून त्यांच्यावर चांगलाच निशाणा साधला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास भारतीय संरक्षण संशोधन व विकास विभाग (डीआरडीओ) आणि ‘भारतीय अंतराळ संशोधन संस्था (इस्रो) यांच्या संयुक्त विद्यमाने विकसित करण्यात आलेल्या A-SAT प्रणालीच्या यशस्वी चाचणीबाबत देशाच्या जनतेला दूरचित्रवाणीद्वारे संबोधित करताना माहिती दिली होती.

ममता बॅनर्जी यांनी मोदींनी देशाच्या जनतेला दूरचित्रवाणीद्वारे संबोधित केल्यावरून त्यांच्यावर निशाणा साधताना, “देशामध्ये आचारसंहिता लागू झाली असून अशावेळेस देशाच्या पंतप्रधानांनी #MissionShakti बाबतची माहिती देण्यासाठी स्वतः पत्रकार परिषद संबोधित करण्याची गरज होती का? मोदी हे तेथे काम करतात की ते स्वतः अंतराळात जाणार आहेत?” असे प्रश्न उपस्थित केले.

याबाबत पुढे बोलताना त्या म्हणाल्या, “#MissionShakti बाबतची माहिती देण्यासाठी शास्त्रज्ञांनी पत्रकार परिषद संबोधित करायला हवी होती कारण हे त्यांचं यश आहे. आम्ही याबाबत निवडणूक आयोगाकडे तक्रार देखील करणार आहोत.”

https://twitter.com/ANI/status/1110861617200128004

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)